इच्छापत्र स्वतःच्या इच्छेप्रमाणेच करणे अपेक्षित ! - ॲड. रोहित एरंडे ©
इच्छापत्र स्वतःच्या इच्छेप्रमाणेच करणे अपेक्षित ! आमची सर्व स्थावर जंगम मिळकत ही मी आणि माझ्या पत्नीने कष्टातून कमविली आहे. आम्हाला २ विवाहित मुले आहेत. आता वयाप्रमाणे आमचे इच्छापत्र (विल) करणार याची कुणकुण लागल्यावर दोन्ही मुले आणि दोन्ही सुना वेगवेगळे भेटून त्यांची इच्छा काय आहे हे सांगायला लागले आहेत. ते लाभार्थी असल्याने त्यांना मृत्युपत्राचा मसुदा वाचायला मिळायला हवा किंवा ते त्यांच्या वकीलांमार्फत करून आणतील अशी त्यांची मागणी आहे. लाभार्थ्याला अशी माहिती कायद्याने सांगणे कायद्याने गरजेचे आहे का ? आमच्या दोस्तांच्या मृत्युपत्राची मसुदा वापरू का ? या सर्वाचा आम्हाला खूप ताण येत आहे. कृपया मार्गदर्शन करावे. एक पालक, मुंबई. प्रॉपर्टी नसली तरी त्रास आणि असली तर जास्त त्रास, असे म्हणतात. आमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस मधून असे आवर्जून सांगावेसे वाटते की सध्याच्या काळात पालकांनी जास्त भावनीक (emotional ) न होता प्रॅक्टिकल होणे गरजेचे आहे कारण भिडस्त स्वभाव / 'नाही म्हण...