Posts

Showing posts from November 11, 2025

जागा वापरली नाही तरी देखभाल खर्च द्यावाच लागतो. : ॲड. रोहित एरंडे ©

 जागा वापरली नाही तरी देखभाल खर्च द्यावाच लागतो.  मी मुंबईला असतो आणि पुण्यामध्ये एका सोसायटीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणून १ फ्लॅट घेतला आहे, मात्र तो फ्लॅट आम्ही बंद ठेवला आहे. आम्ही सोसायटीच्या कुठल्याही सोयी सुविधा वापरत नाही, तरीही सोसायटी आमच्याकडून देखभाल खर्च तसेच सिंकिंग फंड इ.  खर्च वसूल करते. तर अशी आकारणी कायदेशीर आहे का ? एक वाचक, मुंबई  सोसायटी असो वा अपार्टमेन्ट दोन्हीकडे सभासदांच्या वादाचे मूळ हे एकतर आर्थिक कारणांमध्ये किंवा इगो मध्ये असल्याचे दिसून येईल. आपल्या प्रश्नावरून हे आर्थिक विषयाशी निगडित आहे हे दिसून येते.  मेंटेनन्स द्यावाच लागतो.  आपली जागा इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतली आहे का वापरण्यासाठी, का जागा भाड्याने द्यायची का कुलूप लावून बंद ठेवायची  हा सर्वस्वी त्या त्या सभासदाने ठरवायचे. पण सभासद स्वतः जागा वापरत असो किंवा नसो,  त्याने जागा भाड्याने दिली असेल किंवा नसेल, मासिक देखभाल खर्च (मेंटेनन्स, तसेच सिंकिंग फंड ) हा द्यावाच लागतो. ज्या प्रमाणे तुम्ही जागा वापरा किंवा नाही,  महानगरपालिका तुमच्याकडून प्रॉपर्टी टॅक्स वसू...