Posts

Showing posts from November 16, 2025

केवळ विमा पॉलिसी फॉर्म रिकामा ठेवला म्हणून क्लेम नाकारता येणार नाही. ॲड. रोहित एरंडे. ©

केवळ विमा पॉलिसी फॉर्म रिकामा ठेवला म्हणून क्लेम नाकारता येणार नाही.  ॲड. रोहित एरंडे. © मेडिक्लेम पॉलिसी ही अशी वस्तू आहे की जी प्रत्येकाने घेणे गरजेचे असते, पण शक्यतो वापरायची वेळ कोणावर येउ नये ! सध्याच्या काळात उपचार आणि हॉस्पिटल यांचे दर लक्षात घेता चांगली मेडिक्लेम पॉलिसी घेणे गरेजचे आहे (जरी मेडिक्लेम घेण्याचे प्रमाण फक्त २५-३०% लोकांमध्ये दिसून येते) जेणेकरून हॉस्पिटलची बिले परस्पर भागवता येतील. मात्र पॉलिसी घेण्यापेक्षाही ती घेताना जो फॉर्म भरला जातो - ज्यामध्ये प्रामुख्याने आपली एकंदरीत तब्येत आणि पूर्व-आजार यांची नीट आणि बिनचूक माहिती देणे क्रमप्राप्त असते. बरेचदा असा फॉर्म इन्शुरन्स एजंट भरून घेतात, . आपल्यापैकी किती जणांनी असे फॉर्म नीट वाचून आणि पूर्णपणे भरले आहेत आणि एजंटलाही सर्व माहिती दिली आहे, हे तपासून बघा. कारण बऱ्याचदा असे फॉर्म नीट भरले नाहीत, पूर्व-आजारांची माहिती दिली नाही म्हणून कंपनी क्लेम नाकारते आणि आजारपणातून सावरलेल्या लोकांना दुसरा धक्का बसतो पॉलिसी फॉर्म मधील माहितीची शहानिशा करण्यासाठी कंपनी मार्फत इन्शुरन्स अंडररायटर यांची नेमणूक...