पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या भाडयाचा प्रश्न?" ॲड. रोहित एरंडे ©
पुनर्विकास आणि पर्यायी जागेच्या भाडयाचा प्रश्न?" ॲड. रोहित एरंडे © मी ९१ वर्षांचा आहे. मुंबईत आमची स्वमालकीची जागेवर ४०/५० वर्षापासून चाळी बांधून आम्ही रहात आहोत. २० वर्षापूर्वी एका बिल्डरने मोकळया जागेवर दोन इमारती बांधून त्यात १२० सभासद सुखाने रहात आहेत. शिल्लक चाळी खाली केल्या नाहीत म्हणून बिल्डर निघून गेला. दुसऱ्या बिल्डरने पुनवर्विकासामध्ये २ बी.एच.के. जागा देवू केली,. आता एस.आर.ए. मार्फत एक विकासक ४/५ महिन्यांपूर्वी आला. किती जागा देणार काहीही माहिती नाही, मात्र मासिक भाडे रु.२२,०००/- देणार असे सांगितले, पण या भाडयात जवळपास सर्वाना घरे मिळणे अशक्य. मी माझ्या परीने प्रयत्न करतोय. तसेच इमारती व चाळीतील सभासदांचा नफा-तोटा किती होइल ? आम्हाला किती जागा मिळावी ? सुदर्शन सिताराम परब, मुंबई. सर्व प्रथम आपण या वयातही सक्रीय आहात आणि इतरांचा विचार करत आहात याबद्दल आपले अभिनंदन आणि अशाच थँक लेस जॉब करणाऱ्या मंडळींमुळेच पुनवर्विकासाचे काम पुढे जात असते. तुमच्या प्रश्नात अनेक प्रश्न दडलेले ...