सोसायटीला बहुमताच्या जोरावर १०% पेक्षा जास्त ना-वापर शुल्क आकारता येत नाही. ॲड. रोहित एरंडे ©
सोसायटीला बहुमताच्या जोरावर १०% पेक्षा जास्त ना-वापर शुल्क आकारता येत नाही. ॲड. रोहित एरंडे © आमच्या गृहनिर्माण संस्थेत सभासदाने फ्लॅट भाड्याने दिल्यास तेथे बिगर-राहिवासी शुल्क (Non-Occupancy Charges) १०% नियमाच्या ऐवजी सुमारे ३७% आकारले जात आहेत. याशिवाय, संस्था प्रत्येक २२ महिन्यांनंतरच्या नूतनीकरणासाठी (Renewal), ₹१०,०००/- अतिरिक्त आकारणी करते. या बाबतीत हरकत घेतली असता हे निर्णय त्या AGM मध्ये बहुमताने घेतले गेले आहेत असे सांगण्यात आले. कृपया मार्गदर्शन करावे. एक वाचक, वसई. एखादी गोष्ट कायद्याने ज्या प्रकारे करायला सांगितली आहे ती त्याच प्रकारे करायला पाहिजे अन्यथा अजिबात नाही, असे कायद्याचे मूलभूत तत्व आहे, जे तुमच्या प्रश्नाला चपखलपणे लागू होते. या बाबतीतल्या कायदेशीर तरतुदी थोडक्यात बघू या. ना-वापर शुल्क कधी घेतात ? सोसायटीमध्ये एखाद्या सभासदाने स्वतः जागा न वापरता ती जागा तिऱ्हाईत व्यक्तीस भाड्याने दिली असेल, तर सभासदास ना-व...