बंगलो सोसायटीमधीलही डेव्हलपमेंट GB च्या हाती : ॲड. रोहित एरंडे ©
आम्ही , शिवतीर्थ नगर, पुणे येथील माधवबाग सोसायटी या बंगलो सोसायटी मध्ये गेले ४० वर्षे राहतो. आम्ही व आमच्या शेजारील प्लॉट मिळून जॉईंट redevelopment साठी सोसायटीला अर्ज दिला होता मात्र बरच वेळ काढून नंतर जनरल बॉडीमध्ये (G.B) मतदान घेऊन त्या मध्ये प्लॉट अंमलगेशन आणि नवीन सभासदाद सदस्यत्व ची मजुरी घ्यावी लागेल असे सांगितले. मात्र सोसायटीच्या कमिटीने घरोघरी जाऊन वरील ठराव पास होऊ नये या साठी प्रचार केला.आम्ही सुद्धा वरील ठराव पास होणे पुढील काळात किती फायद्याचे ठरेल हे सांगितले. परंतु G.B मध्ये ठराव सोसायटीच्या बाजूने पारित झाला आणि आमचा प्रोजेक्ट जागेवर थांबला. यात आमचे बरेच आर्थिक नुकसान झाले आहे. या पूर्वी २-३ प्लॉटचे अमालगामेशन झाले आहे. तरी वरील विषयास आम्हास योग्य मार्गदर्शन द्यावे. श्री. अश्विन करमरकर, पुणे. आपल्यासारखे प्रश्न हे अश्या अनेक बंगलो सोसायट्यांमध्ये सुरु झाले आहेत. अर्थात प्रत्येकाच्या फॅक्टस वेगळा असू शकतात आणि या प्रश्नांचा विस्तृत उहापोह जागेअभावी येथे करणे शक्...