Posts

Showing posts from January 18, 2026

व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत नको. ॲड. रोहित एरंडे. ©

 व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत नको..   ॲड. रोहित एरंडे. © (लोकमत)  साधारण साठीच्या घरातले एक  जोडपे ऑफिसमध्ये आले  होते.   कोणी बोलायचे असे त्यांनी एकमेकांकडे बघितले आणि शेवटी बायको म्हणाली, जाऊ देत मीच बोलते, हे नवरे काही बोलायचे नाहीत (अनेक बायकांच्या मनातील बोलल्यासारखे !). मी विचारले काय प्रश्न आहे नक्की ? :" सर, मी आणि माझे पती दोघेजण मिळून आमच्या सासू- सासऱ्यांना सांभाळले आहे.  माझ्या नणंदा , भावजया , दीर यापैकी कोणी कोणी  वेळेला मदतीला आले नाहीत. या सर्वांची आर्थिक स्थिती आमच्या पेक्षा खूपच चांगली आहे. मात्र मागचं २ वर्षांत सासू-सासरे दोघेही पाठोपाठ गेले आणि आता  सर्व जण सासऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हक्क मागायला लागले आहेत" - त्या काकू म्हणाल्या आणि परत विचारले, " त्यांचा काय हक्क उरतो आता ?  आम्ही त्यांना हक्कसोड पत्र द्या असे म्हणू शकतो का ?  किंवा आम्ही जे सेवा केली त्यामुळे आम्हाला जास्त हिस्सा मिळायाला हवा ना ?".. ज्योतिषी, डॉक्टर आणि वकील यांचेकडून लोकांना आवडेल  असा सल्ला ऐकायला हवे असते, परंतु त्या...