आईवडील का करिअर ? #लोकमत: ॲड. रोहित एरंडे. ©️
आईवडील का करिअर ? ॲड. रोहित एरंडे. ©️ मुले परदेशात आणि आई वडील इथे असे चित्र आता घरटी बघायला मिळते. स्वतःचे करिअर, आयुष्य असतेच पण त्यापुढे आई वडिलांप्रतीची कर्तव्ये दुय्यम का ठरतात असे वाटण्यासारखे प्रसंग वकीली व्यवसायात बघायला मिळतात. त्यातील हा एक. तीन उच्चशिक्षित मुले अमेरिकेत आणि आईवडील इकडे भारतात एका फाीव्ह स्टार वृद्धाश्रमात. आमच्या एका पक्षकारांनी त्या आईवडिलांचा ३ बीएचके फ्लॅट विकत घ्यायचा ठरवला. हा खरं तर त्या आईवडिलांनी आपल्या तीन मुलांसाठी ठेवला होता. सगळा व्यवहार ठरला. त्याच सुमारास योगायोगाने मोठा मुलगा त्याच्या एका कॉन्फरन्ससाठी दोन दिवस पुण्यात येणार होता. रजिस्टर्ड करारनामा बँकेत दिल्यानंतर बँक या दांपत्याला डीडी देणार होती आणि आमच्या पक्षकारांना फ्लॅटचा ताबा मिळणार होता. परदेशातून आलेला मुलगा फ्लॅटचा ताबा आमच्या पक्षकारांना देण्याच्या वेळीच उभ्याउभ्या आई वडिलांना भेटून मुंबईला आणि तिथून अमेरिकेला परतणार होता. सर्व सोपस्कार होऊन दुपारी चारच्या सुमारास आमच्या पक्षकाराला फ्लॅटचा ताबा मिळाला. त्यानंतर आम्ही निघालो. या आईवडिलांचा मुलगा नेमका बिझी असल्याम...