सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी : लग्नानंतर नॉमिनेशन बदलणे अनिवार्य : सर्वोच्च न्यायालय.: Adv. रोहित एरंडे ©
सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी : लग्नानंतर नॉमिनेशन बदलणे अनिवार्य : मा. सर्वोच्च न्यायालय. लग्न करणे हे ऐच्छिक असले तरी जे करतात त्यांच्यासाठी आयुष्यभराच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो जिथे सहजीवन आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देखील सुरु होतात आणि नवऱ्यांच्या बाबतीत आई का बायको अशी ओढाताण सुरु होऊ शकते. हिंदू वारसा कायद्याप्रमाणे एखाद्या हिंदू पुरुषाचे मृत्युपत्र न करता निधन झाल्यास त्याचं मिळकतीचे वारसदार असणाऱ्या क्लास-१ वारसांमध्ये बायको आणि मुले यांच्याबरोबरच सामान हिस्सेदार म्हणून आईचा देखील समावेश होतो , वडील क्लास-२ मध्ये येतात. तर लग्नापूर्वी नॉमिनी म्हणून आई -वडिलांचे नाव लावेल असले तरी लग्न झाल्यावर वैवाहिक जोडीदारालाही General Provident Fund (GPF) म्हणजेच सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी मध्ये समान हिस्सा मिळतो का , असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयापुढे नुकताच उपस्थित झाला आणि या प्रश्नाचे होकारार्थी उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की मयत कर्मचार्याचे GPF चे लाभ त्याचे पालक आणि व...