Posts

Showing posts from December 16, 2025

स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये हट्ट करून हक्क मिळत नाही ऍड. रोहित एरंडे.©

  स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये  हट्ट करून   हक्क मिळत  नाही  ऍड. रोहित एरंडे.© माझे वय आता ७५ झाले आहे. मी कष्टाने काही मिळकती करून ठेवल्या आहेत. मला २ मुले आणि  एक मुलगी आहे. मोठा मुलगा मागील वर्षी  अचानक गेला. आता  त्याची बायको आणि मुले माझ्या मिळकतीमध्ये हक्क द्याच असा हट्ट करू लागली आहेत. कुठून कुठून निरोप पाठवत आहेत. मला आणि माझ्या पत्नीला याचे टेन्शन येते आहे. कायद्याने माझ्या सुनेला आणि नातवंडांना असा हक्क मला द्यावा लागेल का ?    एक वाचक, पुणे.  हक्क असणे आणि हक्काचा हट्ट करणे या दोन वेगवेळ्या गोष्टी आहेत आणि हट्ट करून नसलेला हक्क निर्माण होत नाही.  एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच आणि   एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो.  कोणत्याही हिंदू स्त्री- पु...