ऑनलाईन खरेदी : "अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा " - Adv. ROHIT ERNADE ©
ऑनलाईन खरेदी : "अती लोभ त्या क्षोभ होईल जाणा " ॲड. रोहित एरंडे.© प्रॉपर्टी /मिळकतीचे सामन्यपणे दोन प्रकारात वर्गीकरण होते - स्थावर (Immovable) मिळकत आणि जंगम (Movable ) मिळकत. स्थावर मिळकतीमध्ये आपले घर, फ्लॅट, दुकान जमीन, बंगला इ. चा समावेश होतो., तर जंगम मिळकतीमध्ये आपल्या वस्तू, पैसे, दाग-दागिने , शेअर्स, इन्वेस्ट्मेन्ट्स अश्या गोष्टींचा समावेश होतो. या सर्व गोष्टी घेण्यासाठी काहीतरी किंमत (पैसे) द्यावी लगते आणि त्यामध्ये आपली फसवणूक होऊ नये याची जबाबदारी आपल्यावरच असते. स्वतःचे घर असावे अशी बहुतेक सगळ्यांचीच कांक्षा आयुष्यात असते आणि या साठी प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. सध्याच्या काळात वाढती लोकसंख्या आणि उपलब्ध जागा ह्यांचे प्रमाण व्यस्त झाले आहे आणि पर्यायाने किंमतीत वाढ झाली आहे. आपल्या कष्टाच्या पैशाने घराचे स्वप्न हे निर्वेधपणे पूर्ण व्हावे आणि आपली फसवणूक होऊ नये ह्या साठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.कुठलीही जागा विकत घेताना करारनामा करणे गरजेचे असते आणि काही वाद विव...