कोरोना काळ - एकमेकांच्या ' माहितीची ' माहिती करून घेण्याची गरज.

 कोरोना काळ - एकमेकांच्या ' माहितीची ' माहिती करून घेण्याची गरज. 

ॲड. रोहित एरंडे.©

" मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्याचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा".. 

ह्या कोरोना काळात जीवनाची अनिश्चितता आपल्याला उमगली आहे.   आपल्या प्रत्येकाच्या ओळखीचे कोणीना कोणीतरी कोरोना ला बळी पडले आहे. 

ह्या अचानक धक्क्याने घराची, धंद्याची पूर्ण घडीच विस्कटून गेल्याचे दिसून येते.

 ह्या काळात वकील मंडळींकडे मृत्यूपत्राबाबत विचारणा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मात्र ह्या बाबतीत काही गोष्टी कॉमन जाणवल्या त्या म्हणजे जोडीदारांना एकमेकांच्या प्रॉपर्टी बद्दल, बँक खाती, पॉलिसी, शेअर्स, ऑनलाईन बँकिंग करत असल्यास त्याचे पासवर्ड, ते कसे वापरायचे ह्याची काहीच माहिती नसते.

बऱ्याच वेळा एकमेकांचे फोनचे पासवर्ड देखील माहिती नसतात. 

दुर्दैवाने असा अनुभव आहे की बरेचदा महिला मंडळींना ह्या बाबतीत फारच कमी माहिती असते. ह्याचा तोटा पुढे जेव्हा अघटीत घडते तेव्हा जाणवतो. 

ह्या सर्व गोष्टी पैश्याशी निगडित आहेत. "पैसा खुदा तो नही, लेकीन खुदासे कम भी नही" हे तितकेच खरे आहे. शेवटी सर्व ठिकाणी पैसा लागतो आणि त्या बाबतीत आपण आणि आपल्या जोडीदाराने, कुटुंबाने स्वयंपूर्ण असणे गरजेचे आहे.

त्या मुळे ह्या काळात ' विश्वासाने ' एकमेकांच्या अश्या माहितीची देवाण - घेवाण करा. कुठे investments आहेत, कुठे काय आहे ह्याची माहिती द्या आणि शक्य असल्यास एखाद्या वहिमध्ये ते लिहून ठेवा.


Either or survivor(E&s) आणि joint खात्यामधील फरक :

बऱ्याचदा आम्ही बँक खाती either or survivor ठेवण्यास सांगतो, जेणे करून जो राहील त्यास रक्कम मिळते.. पण खाते " जॉइंट " असेल तर मात्र प्रत्येक खातेदाराचा ५०% हिस्सा असतो, जो मृत्युनंतर विल प्रमाणे अथवा वारसा कायद्याप्रमाणे वारसांना मिळतो.

सबब शक्यतो आपल्या हयातीमध्ये E&S करून घ्यावे, जेणेकरून पुढील त्रास वाचतात.  कोरोना काळात तर पैसे खात्यामध्ये आहेत पण सही करणारा जोडीदार मरण पावल्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. आता अश्या परिस्थितीमध्ये वारसा हक्क प्रमाणपत्र घेतल्याशिवाय पर्याय नाही आणि हे वेळ खावू काम आहे. म्हणूनच आपले अकाऊंट एकत्र करून घ्यावे, भले ऑपरेट करणारा एकच असेल.

विल किंवा मृत्युपत्र करण्याचे झाल्यास आपल्या सर्व मिळकतीची अशीच यादी करण्यास आम्ही सांगतो.

इतर कुठल्याही दस्तांच्या तुलनेत मृत्युपत्र करणे सर्वात सोपे आणि तुलनेने कमी खर्चाचे आहे. ह्या साठी तज्ञ वकिलांचा सल्ला घ्या. खालील लेखात ह्याची माहिती आहेच.

https://vedhkaydyacha.blogspot.com/2020/06/blog-post_21.html


कोर्टामध्ये वारसा हक्क प्रमाणपत्र घेण्यासाठी जेव्हा आम्ही माहिती मागतो, तेव्हा जर नवरा मयत असेल, तर बऱ्याचदा बायकोला ह्याची काहीच माहिती नसते आणि तिची अवस्था केविलवाणी होते.


असो. सर्व नाती ही विश्वासावर टिकलेली असतात.

सबब आता ह्या काळात ' विश्वासाने ' वरील प्रमाणे एकमेकांची माहिती एकमेकांना असणे गरजेचे आहे. 


धन्यवाद.. काळजी घ्या. God is Great 🙏

ॲड. रोहित एरंडे.

पुणे.©

Comments

  1. काळाची गरज आहे. मृत्यू वय अलीकडे आलेय. त्यामुळे आता साठीची घंटा वैगेरे प्रकार नाही. आजचा दिवस आपला एवढेच.
    डोळ्यात अंजन घालणारा लेख.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©