पाणीगळती आणि सोसायटीची जबाबदारी. ऍड. रोहित एरंडे ©

  पाणीगळती आणि सोसायटीची जबाबदारी.

 ऍड. रोहित एरंडे ©

आमच्या सोसायटीमध्ये या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणी गळती झाली आहे. टॉप टेरेस मधून आणि  बाजूच्या भिंतींमधूनसुद्धा गळती होऊन काही सभासदांच्या फ्लॅट मध्ये पाणी गळत आहे. सोसायटीला आम्ही सांगितले तर ते काहीही करत नाहीत, तुमचे तुम्ही बघा असे सांगतात.    तर याबाबतीत सोसायटीची कायदेशीर जबाबदारी काय आहे ?   

त्रस्त सभासद, पुणे.. 

सोसायटी आणि पाणी गळती हा प्रश्न पावसाळ्यात अधिक "ज्वलंत" होतो..   याबद्दलची कायदेशीर माहिती थोडक्यात बघू या. 

सोसायटीची जबाबदारी : 

सोसायटीच्या दुरुस्त उपनियम १५९ मध्ये सोसायटीने  दुरुस्तीचे आणि देखभालीची कुठले कुठले खर्च करणे गरजेचे आहे, त्याची यादी दिलेली आहे. ह्या मध्ये सर्व प्रकारच्या पाण्याच्या गळत्या ज्यामध्ये पावसाच्या होणाऱ्या गळत्या आणि बाहेरील सामाईक पाईप तसेच मलनिःस्सारण वाहिनीमधून होणाऱ्या गळत्या ह्यांचा देखील समावेश होतो. तसेच पावसामुळे  गच्चीमधून होणाऱ्या गळतीमुळे टॉप फ्लॉवर फ्लॅटचे छत तसेच त्यावरील प्लास्टर खराब होणे, ह्या खर्चाचा समावेश होतो,  जो सोसायटीने करणे गरजेचे आहे. या बाबत न्यायालयांचे निर्णय देखील आहेत. 

पहिला निकाल आहे २००६ साली  मा. मुंबई उच्च न्यायालयाचे मा. न्या. बी.एच मर्लापल्ले  ह्यांनी   'हंबल को.ऑप. सोसायटी विरुद्ध शाम आणि लता बलानी'  ह्या याचिकेवर दिलेला. ह्या केसमध्ये श्रीमती बलानी ह्यांच्या टॉप फ्लॉवर वर असलेल्या फ्लॅट मध्ये वरच्या गच्चीमधून गळती होत असते. मात्र हि गच्ची श्रीमती  शेट्टी ह्यांच्या मालकीच्या फ्लॅटला लागून  असल्यामुळे  (अट्याच्ड टेरेस)  सोसायटीचा त्याचाशी संबंध नाही आणि म्हणून  श्रीमती बलानी ह्यांनी केलेला दुरुस्तीचा खर्च देण्यास सोसायटी बांधील नाही  हा सोसायटीचा युक्तिवाद फेटाळताना मा. कोर्टाने, जागेचा मालकी हक्क कोणाकडे आहे ह्या पेक्षा  सोसायटी उपनियमांप्रमाणे अश्या खर्चाची  जबाबदारी हि सोसायटीची आहे सबब  श्रीमती बलानी ह्यांनी दुरुस्तीचा  केलेला खर्च देण्यास सोसायटी बांधील असल्याचा निकाल दिला. 

तसेच   'पाम बीच सोसायटी, नवी मुंबई विरुद्ध सलील बोस' २०१७  राज्य ग्राहक आयोग (  मा.न्या. ए.पी. भंगाळे).या  केसमध्ये टॉप फ्लोअर वर राहणाऱ्या श्री. सलील बोस ह्यांच्या फ्लॅट मध्ये गच्चीमध्ये साठणाऱ्या पाण्यामुले गळती होऊ लागते.  सोसायटीचे म्हणणे असते कि आम्ही वॉटर प्रूफिंग करून घेतले आहे, परंतु  श्री, बोस ह्यांनी फ्लॅटमधील  भिंतींमध्ये  केलेल्या  गैरकायदा फेरबदलामुळेच हि गळती होत आहे त्यामुळे तो खर्च करण्यास सोसायटी बांधील नाही. सोसायटीचा हा बचाव फेटाळताना कोर्टाने नमूद केले कि एकतर सदरील सभासद नियमितपणे मेंटेनन्स भरत आहे आणि  असे कथित  गैरकायदा स्ट्रक्चरल फेरफार सभासदाने केले आहेत, अशी कुठलीही नोटीस सोसायटीने दिलेली  नाही. आणि महत्वाचे म्हणजे  कथित वॉटर प्रूफिंगचे काम  व्यवस्थित झाले आहे, असे कुठलेही आर्किटेक्ट / स्ट्रक्चरल इंजिनीअरचे प्रमाणपत्र सोसायटीने दिलेले नाही आणि  सोसायटी उपनियमाप्रमाणे सोसायटी बिल्डिंग सुयोग्य स्थितीमध्ये ठेवण्याची जबाबदारी सोसायटीची असते त्यामुळे सोसायटी हा खर्च करण्यास बांधील आहे, असे शेवटी कोर्टाने नमूद केले. 

अपार्टमेंट बाबतीत, असा खर्च कसा करायचा ह्याची तरतूद अपार्टमेंटच्या बाय लॅ।ज मध्ये केलेली असणे संबंधित कायद्याप्रमाणे अपेक्षित आहे. 


फ्लॅटधारक कधी जबाबदार ? 

 उपविधी  ६८ (ब) आणि १५९ (ब ) मध्ये स्पष्टपणे हे नमूद केले आहे कि अनुक्रमे उपनियम ६८ आणि १५९ (अ ) मध्ये ज्या दुरुस्त्यांचा अंतर्भाव नाही, अश्या दुरुस्त्या सदस्यांनीच  स्वखर्चाने केल्या पाहिजेत आणि पुढे विशेष करून असे नमूद केले आहे कि "शौचालय /सिंकमुळे होणारी अंतर्गत गळती संबंधित सदनिकाधारकणारे स्वखर्चाने थांबविली पाहिजे आणि त्याबद्दलची माहिती त्याने  संस्थेला दिली पाहिजे पाहिजे.

त्यामुळे आपल्या प्रश्नाप्रमाणे पाणीगळती खर्चासुध्दा दुरुस्त करण्याची जबाबदारी सोसायटीची आहे.  


ऍड. रोहित एरंडे ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©