Posts

Showing posts from February 22, 2026

मंजूर नकाशाच्या बाहेर जाऊन कुठल्याही प्रकारचे बांधकाम, रचनात्मक (स्ट्रक्चरल ) बदल करता येत नाहीत : ॲड. रोहित एरंडे ©

 आमच्या सोसायटी मधील दुसऱ्या मजल्यावरील सदनिका धारकांनी त्यांच्या समोर जोडून आलेल्या ज्याला प्लॅन मध्ये NoN Accessible Terrace (NAT)  म्हंटले आहे त्यावर पत्रा शेड टाकले आहेत त्याच्या आम्हा तिसऱ्या मजल्यावर असणाऱ्या सदनिका धारकांना त्रास होत आहे जसे की त्यावर कचरा साठणे, स्वच्छ हवा न येणे तसेच समोर असलेले दृश्य व्यवस्थित न दिसणे अशा बऱ्याच गोष्टींचा त्रास आम्हाला सहन करावा लागत आहे. घरातील सदस्य त्यामुळे आजारी पडत आहेत .   तर यावर आपल्याला काय करता येईल ह्याबद्दल मार्गदर्शन पाहिजे होते. एक वाचक, पुणे.   करारनामा आणि मंजूर नकाशाप्रमाणे मिळालेल्या जागारूपी  अंथरुणातच  सभासदांनी  पाय पसरणे अपेक्षित आहे.   मोकळी जागा दिसली कि ती "आपलीशी" करणे , मोकळ्या पॅसेजला ग्रील लावणे असे प्रकार सर्रास बघायला मिळतात आणि कायद्याच्या भाषेत ह्याला अतिक्रमण (एन्क्रोचमेंट) असे म्हणता येईल. या संदर्भात सोसायटी आदर्श उपविधी १६९ (अ) मध्ये स्पष्ट तरतुदी केल्याचे आढळून येईल. ह्या तरतुदीप्रमाणे जिना, पायऱ्या, लँडिंग एरिया, सामायिक पार्किंग स्पेस, कॉरिडॉर आणि अश...