जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही.. वर्षे सरली, आठवणी ताज्याच. ऍड. रोहित एरंडे.©

जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही.. वर्षे सरली, आठवणी ताज्याच.

ऍड. रोहित एरंडे.©

लेखातील व्यक्ती कायद्याशी संबंधित आहेत, परंतु लेख कायदेविषयक  नाही.. ( :) )

मरणानंतर पुनर्जन्म असतो की नाही हा वादाचा विषय असू शकतो.. परंतु जिवंतपणी पुनर्जन्म मिळू शकतो ? उत्तर आहे होय आणि योगायोगाने दोन्ही घटनांची तारीख होती ३ नोव्हेंबर.

पहिली घटना आहे माझे सासरे आणि पुण्यातील प्रख्यात वकील श्री. पी.पी. परळीकर ह्यांच्या बाबतीतील. सुमारे २००६ साली त्यांना लिंफनोड (N H L) च्या कॅन्सरचे निदान झाले. त्याचे केमो - रेडिएशन असे उपचार सुरू झाले. ह्या उपचाराचे काही साईड एफिकेट्स असतातच. त्याचाच परिपाक म्हणजे सासऱ्यांना एक दिवस अचानक cardiac arrest आला आणि ते घरीच कोसळले. घरच्यांनी आणि शेजारच्या सहस्रबुद्धे काकांनी ( सकस वाले) पटकन त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये हलविले, परंतु हे १० मिनिटांचे अंतर देखील त्यावेळी काही तासांचे वाटत होते. तिकडे लगेचच उपचार सुरू झाले, परंतु त्यांचे हृदय जवळ जवळ बंद पडले होते, नाडी लागत नव्हती. डॉक्टरांनी २ शॉक देवून सुध्दा हृदय सुरू झाले नाही आणि स्क्रीन वरती फ्लॅट लाईन आली. त्यावेळचे तेथील आय सी यू इन्चार्ज डॉ. समीर जोग ह्यांनी आमच्या सासऱ्यांचे धाकटे बंधू आणि प्रसिध्द मानसोपचार तज्ञ डॉ. वासुदेव परळीकर ह्यांना परिस्थितीची कल्पना दिली आणि तिसरा शॉक दिला तर फायदा होणार नाही आणि झाल्यास सासरे आयुष्यभर  लोळागोळा होवून पडतील असे सांगितले. परंतु डॉ. वासुदेव ह्यांनी सांगितले की मी सर्व जबाबदारी घेईन, पण तुम्ही तिसरा शॉक द्याच असे सांगितले. ( त्यावेळी मी डॉक्टर असून असा निर्णय का घेतला, ह्याचे उत्तर माझ्याकडे नाही असे डॉ. वासुदेव सांगतात) अखेर तिसरा शॉक दिला आणि देवाची कृपा, स्क्रीन वरची 'फ्लॅट लाईन' जावून हृदय सुरू झाले.!! खरा चमत्कार तर पुढेच आहे. Cardiac arrest  मुळे मेंदूला रक्तपुरवठा बंद पडल्यामुळे शरीरातील फास्ट ग्रोईंग पेशी मेल्या आणि  कॅन्सरच्या पेशी सर्वात जास्त फास्ट ग्रोईंग असल्यामुळे त्या  देखील मेल्या आणि त्यांचा कॅन्सरच  बरा झाला. हा एक  चमत्कारच म्हणावा असे आहे.  अशी घटना लाखात एकदाच घडते आणि जीवघेणा cardiac arrest हा सासऱ्यांसाठी वरदान ठरला होता, आणि कृत्रिमरीत्या cardiac arrest आणून सुद्धा इतर कॅन्सर पेशंटला फायदा होणार नाही, असे. डॉक्टरांनी सांगितले... त्यानंतर देव दयेने त्यांनी कालांतराने वकिली देखील सुरू केली आहे. 🙏🙏


****** ******* *******  ******* ******* ******

दुसरी घटना आहे २०१४ सालची माझ्या बायकोची, अनघा बद्दलची. त्या ३ नोव्हेंबरला अनघा सकाळी बाहेर वाळत घातलेले कपडे आणण्यासाठी गेली होती. तेवढ्यात तिला काहीतरी हातावर चावल्या सारखे वाटले आणि तिने बघितले तर हातावर सुरवंट (घुला). तिने तो पटकन झटकला आणि आत आली. थोड्या वेळाने मात्र तिला हाताला खाज सुटली आणि तो भाग लाल झाला आणि अचानक तिला श्वास घ्यायला त्रास सुरू झाला. तिला आपला गळा कोणी तरी आवळतय असे वाटू लागले. मी पटकन आमचे स्किन स्पेशालिस्ट डॉक्टर अनिल पत्की ह्यांना फोन केला आणि त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित क्लिनिक वर यायला सांगितले आणि येताना अड्रेलिन चे इंजेक्शन आणायला सांगितले.  तो पर्यंत सासू सासरे घरी आले कारण आमची २ वर्षांची अवनी घरीच होती. घर ते क्लिनिक हे फक्त ५ मिनिटांचे अंतर आहे, पण ते मला ५ तासांचे वाटले. आम्ही लगेचच क्लिनिक ला पोहोचलो. पत्की काका तर पळत पळत आला आणि वेळ न दडवता लागलीच ते इंजेक्शन दिले.आम्हाला अजुन २ मिनिटे  जरी उशीर झाला असता तरी, काहीतरी बरे वाईट झाले असते एवढी अनघाची स्थिती वाइट होती, असे पत्की काका म्हणाल्यावर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. अनघाला anaphylactic reaction आली होती.. नंतर आम्ही लगेचच दीनानाथ मध्ये गेलो, तिकडे अनघाच्या डॉक्टर काका काकूंनी सगळी तयारी ठेवली होतीच, पण सुदैवाने तिची तब्येत लगेचच सुधारली. 


हे दोन्ही प्रसंग म्हणजे पुनर्जन्मच होत ह्यात काही शंका नाही आणि आम्ही दरवर्षी आजच्या दिवशी त्यांचे वाढदिवस पुन्हा साजरे करतो. शेवटी काय, देव तारी त्याला कोण मारी, ह्याची प्रचिती आम्ही घेतली.

योग्य वेळी योग्य उपचार मिळणे हे खूप गरजेचे असते ह्यात काही शंका नाही आणि ह्या दोन्ही प्रसंगांमध्ये दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल डॉक्टर देवदूतच ठरले होते, ह्यात काहीही शंका नाही. डॉक्टरांना सलाम..🙏

धन्यवाद.. काळजी घ्या..

God is Great 🙏🙏

ऍड. रोहित एरंडे..©

Comments

  1. It's a great NEWS.... Increadible ... Really... विश्वास ठेवणाऱयांसोबतच चमत्कार घडतात. GOD is Great ....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©