(पण मुलीला ) लग्नात सगळे दिले आहे ना...#लोकमत

 (पण मुलीला ) लग्नात सगळे दिले आहे ना...#लोकमत 

ॲड. रोहित एरंडे. ©

वडिलांना  हाताला धरून ती माझ्या ऑफिस मध्ये आली. वडिलांना बसतानाही धाप लागत होती. सख्खा धाकटा भाऊ परदेशी असल्यामुळे, आपल्या नोकरीच्या  व्यापातूनही,  तीच आई -वडीलांची  काळजी घेत होती. वडील उच्चशिक्षित, मोठ्या पदावरून निवृत्त झालेले ! वडील मृत्यूपत्र करण्यासाठी आले होते. त्यांनी तिला हळूच बाहेर जायला सांगितले.  मग एका कागदावर त्यांनी  कोणाला काय काय द्यायचे लिहून आणले होते.  त्यातील एका वाक्याने मी आश्चर्यचकित झालो. 


"मी मुलीला तिच्या लग्नात सगळे काही (म्हणजे दागिने इ.) दिले आहे आणि लग्नाचा खर्चही केला आहे, म्हणून मी तिला काही देऊ इच्छित नाही आणि तिनेही हे गोड मानून घ्यावे". 


 अर्थातच सर्व मिळकती त्यांनी कोणाला दिल्या असतील हे सांगायची गरज नाही.  मी त्यांना न राहून विचारले, मुलाचे लग्न कसे केले, त्यावर लगेच ते म्हणाले , अर्थातच धूम धडाक्यात, भरपूर खर्च केला, आमचा एकुलता एक मुलगा - वंशाचा दिवा आहे तो आणि ही  मिळकत आमच्याच घरात राहायला हवी,  मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरात गेलीय, माझी मिळकत तिच्या सासरच्यांकडे जायला नको.. .. 

मी विचारले, "मग समजा तुमच्या मुलाला पुढे  मुलगीच झाली तर  मिळकत कुठे जाणार ?  हा प्रश्न  ऐकल्यावर ते चपापले आणि काहीच बोलले नाहीत, कारण ते "वंशाच्या दिव्यावर" ठाम होते. 


अर्थात सगळीकडे असेच  प्रकार असतात असे  नाही, उलटे प्रकारही असतात. तरीही सुशिक्षित कुटुंबातील अशी वाक्ये आणि मिळकत, संपत्ती आली की माणसांची अजब वर्तणूक मला कायमच विचारात पाडतात. ..असो.  मग त्यांनी मुलीला हाक मारली आणि तिचा हात धरुन  वडील पुढच्या डॉक्टरांच्या अपॉइंटमेंट साठी निघाले.


  एखादी गोष्ट नैतिकदृष्टया गैर असली तरी कायदेशीर दृष्टया सुद्धती गैर असेलच असे नाही, हे वरील उदाहरणावरून सांगता येईल. एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच आणि   एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने (टेस्टमेंटरी सक्सेशन) किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने (इंटेस्टेट सक्सेशन )  तबदील होऊ शकतो.  कोणत्याही हिंदू स्त्री- पुरुषांच्या   स्वकष्टार्जित मिळकतीमध्ये त्यांच्या हयातीमध्ये  त्यांच्या  वैवाहिक जोडीदाराला,    मुलांना देखील कुठलाही मालक हक्क मिळत नाही, त्यामुळे सुनबाई / जावई आणि नातवंडे तर खूपच दूर राहिले. 


अर्थात  एखादा हिंदू पुरुष आणि स्त्री  मृत्यूपत्र न करता मरण पावले तर त्यांच्या स्वकष्टार्जित  संपत्तीची विभागणी वेगवेगळ्या तरतुदींप्रमाणे  होते. ह्यासाठी ढोबळ मानाने वारसांची  क्लास-१ -हेअर्स (वारस) आणि क्लास-२-हेअर्स (वारस) अशी विभागणी केलेली आढळते. .

आमच्याकडे येणाऱ्या अनेक केसेस मधून असे आवर्जून सांगावेसे वाटते की सध्याच्या काळात  पालकांनी जास्त भावनीक (emotional )  न होता प्रॅक्टिकल होणे गरजेचे आहे कारण  भिडस्त स्वभाव  / 'नाही म्हणता न येणे' याने अनेक प्रश्न निर्माण होतात आणि आपण आपलेच मानसिक समाधान  गमावून बसतो, जे बाजारात विकत मिळत नाही.     मृत्युपत्र किंवा इच्छापत्र याची व्याख्याच "एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेबद्दल तिच्या इच्छेचा कायदेशीर दस्तऐवज, जो तिच्या मृत्यूनंतर अंमलात आणला जावा" अशी कायद्याने केलेली दिसून येते. त्यामुळे मुलांच्या नाही तर आपल्या इच्छेप्रमाणेच मृत्युपत्र करणे अपेक्षित आहे. परंतु हे करताना 


ॲड. रोहित एरंडे. ©

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©