Posts

Showing posts from April 27, 2026

पुनर्विवाह आणि सावत्र मुलांचे हक्क. : #लोकमत - ॲड. रोहित एरंडे ©

 साधारण पन्नाशीच्या आसपास वाटावेत  असे एक जोडपे  ऑफिसमध्ये आले होते. त्यांनी सांगितले की ते दोघेही घटस्फोटित आहेत आणि त्या महिलेला पहिल्या  लग्नापासून एक  मुलगा   आहे,  आणि  सध्या ते लिव्ह-इन मध्ये राहत असून लवकरच ते लग्न करणार आहेत. पण आता जर दुसरे लग्न झाले तर पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला होणाऱ्या नवऱ्याच्या मिळकतीमध्ये हिस्सा मिळेल का ? किंवा पहिले लग्न झाले तेव्हा जी काही मिळकत त्या महिलेने घेतली असेल तिच्यावर तिच्या आधीच्या नवऱ्याचा हक्क राहील का होणाऱ्या नवऱ्याचा   ? असे अनेक  प्रश्न त्यांच्यापुढे होते.  त्यांच्याशी बोलताना हे जाणवले की आधीच्या आयुष्यातील कटू अनुभवांमुळे पुढील पावले उचलण्याआधी  त्यांना काही गोष्टीत भावनांच्या आहारी न जाता स्पष्टता   हवी होती.  सध्याच्या काळ बदलला आहे.    आयुष्यात कधीतरी अशी वेळ येते की "विस्कटलेला संसार चालू ठेवायचा का घटस्फोट घेऊन मोकळे व्हायचे".    पूर्वी  दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबूपण" सोडून आपल्या द...