" क्रेडिट कार्डचे पूर्ण पैसे भरूनही सिबिल स्कोर कमी दाखवणे ही सेवेतली त्रुटीच" - ग्राहक न्यायालय. ऍड. रोहित एरंडे ©
"क्रेडिट कार्डचे पूर्ण पैसे भरूनही सिबिल स्कोर कमी दाखवणे ही सेवेतली त्रुटीच" - ग्राहक न्यायालय. ऍड. रोहित एरंडे © आपल्याला किती रुपयांचे कर्ज पाहिजे आणि प्रत्यक्षात किती कर्ज मिळणार यासाठी इतर कायदेशीर बाबींबरोबर अजून एक तीन आकडी संख्या कर्ज घेणाऱ्यांना सतावत असते आणि ती म्हणजे सिबिल स्कोर आणि प्रत्येक जण आपला सिबिल स्कोर ३०० पासून ९०० पर्यंत असा चढत्या क्रमाने जास्तीत जात चांगला ठेवायचा प्रयत्न करत असतो. आर.बी.आय. मान्यताप्राप्त २००० साली अस्तित्वात आलेल्या ' क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो ऑफ इंडिया लिमिटेड' ह्याचे संक्षिप्त नाव म्हणजे "सिबिल" आता ह्याचे नाव ट्रान्स युनिअन सिबिल असे झाले आहे. तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचे आणि कर्जाची परतफेड जेवढी बिनचूक कराल तेवढा तुमचा सिबिल स्कोर चढत्या क्रमाचा असतो. सोप्या शब्दांत सिबिल स्कोर हा आपली कर्ज फेडण्याची योग्यता आहे की नाही हे दर्शविणारा आरसा समजला जातो आणि या आरश्याला कर्ज फेडण्यात कसूर झाल्यास तडे जावू शकतात. परंतु वेळेत कर्ज फेड करूनही क्रेडिट...