Posts

Showing posts from April 4, 2026

नैतिकता अनैतिकतेच्या हिंदोळ्यावर.. ॲड. रोहित एरंडे ©

नैतिकता अनैतिकतेच्या हिंदोळ्यावर..  इतर देशांमध्ये माहिती नाही, पण आपल्याकडे तरी वैवाहिक नाते आणि पर्यायाने सासू-सासरे आणि सून -जावई   नाते अनेक कंगोरे असलेले असते आणि त्यातल्या त्यात सासू आणि सून यांचे  नाते  "कॅलिडोस्कोपिक" आहे असे म्हणता येईल.  ही नाती म्हंटली की हक्क  / अधिकार आले आणि त्याच्याच जोडीला कर्तव्ये देखील आली. एकाचा हक्क हा दुसऱ्याचे कर्तव्य असू शकते.  या हक्क कर्तव्यांमध्ये नैतिक आणि कायदेशीर असे दोन उपविभाग म्हणता येतील. कायदेशीर कर्तव्यांमध्ये  कसूर झाला तर कायद्याचा बडगा उगारला जाऊ शकतो, पण नैतिक / मॉरल कर्तव्यांमध्ये कसूर झाला तर न्यायालयात दाद मागता येत नाही. एखादी गोष्ट व्यवहारात अनैतिक वाटली तरी ती बेकायदेशीर असेलच असे नाही कारण अनैतिकतेचि व्याख्या ही स्थळ कालपरत्वे बदलू शकते, पण कायद्याचे तसे नसते.  असाच एक नैतिकता महत्त्वाची का   कायदेशीर  कर्तव्य असा प्रश्न राकेश कुमार व इतर विरुध्द उत्तर प्रदेश सरकार (फौजदारी रिव्हिजन याचिका क्र.  6502 of 2025) या याचिकेच्या निमित्ताने मा. अलाहाबाद उच्च न्या...