Posts

Showing posts from March 12, 2026

विशिष्ट परिस्थितीमधील इच्छामरणावर "सर्वोच्च" मोहोर ॲड. रोहित एरंडे .

  विशिष्ट परिस्थितीमधील इच्छामरणावर "सर्वोच्च" मोहोर ॲड. रोहित एरंडे . आपल्या प्रत्येकाची इच्छा असते की , हॉस्पिटल मध्ये शरीरात नळ्या खुपसून  खितपत न पडता  कोणालाही त्रास न होता  अगदी सहज  मरण यावे,.  मात्र आपल्या इच्छेप्रमाणे रेडीओवर गाणी सुद्धा लागत नाहीत, तर असे सहज मरण येईलच  असे नाही.   आपला  रुग्ण बरा होण्यासाठी जवळची लोकं  वेळ, पैसे आणि मानसिक शांतता खर्च झाली तरी जेवढे शक्य होईल तेवढे उपाय करीत असतात . मात्र   असाध्य आजारासाठी व्हेंटिलेटर सारख्या जीवन समर्थन प्रणालीवर उपचार कितीवेळ चालू ठेवावेत  असा विचार संबंधितांच्या मनात  येतोच. आपल्यावर किंवा आपल्या प्रियजनांवर अशी  वेळ येऊ नये आणि त्यापेक्षा   डॉक्टरांनी  एखादे इंजक्शन डॉक्टरांनी देऊन  शांतपणे शेवटचा श्वास घेतला  असे  अनेकांना वाटत असते. इच्छामरण संकल्पनेचा इतिहास : पी. रथिनम वि . भारत सरकार (1994) 3 SCC 394) ,या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जगण्याच्या अधिकारात मरण्याचा अधिकार देखील समाविष्ट होतो असे  पहिल्यांदाच नमूद के...