Posts

Showing posts from April 10, 2026

शबरीमला पुनर्विचार याचिका प्रकरण (Review Petition) – नक्की काय आहे ? ॲड. रोहित एरंडे ©

  शबरीमला पुनर्विचार याचिका  प्रकरण    (Review Petition) – नक्की काय आहे ?  ॲड. रोहित एरंडे © अनेकांनी या विषयावर लिहिण्याची इच्छा व्यक्त केल्याने हा विषय थोडक्यात सांगण्याचा हा प्रयत्न.  शबरीमालाची पार्श्वभूमी :  केरळमधील शबरीमला मंदिर सुमारे  ८०० वर्षांपूर्वी राजा राजशेखर याने बांधल्याचे मानले जाते.  भगवान अय्यप्पा यांचे निवासस्थान मानले गेलेले (भगवान शिव आणि मोहिनी यांचा पुत्र) यांना समर्पित हे  सोन्याचा मुलामा दिलेल्या पायऱ्या असलेले मंदिर पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पेरियार व्याघ्र प्रकल्पात स्थित असून, मकर संक्रांतीच्या वेळी येथे 'मकरविलक्कू' (ज्योत) पाहण्यासाठी जगभरातून भाविक येतात.  या मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी परंपरागत काही चाली रीती पाळल्या जातात. यामधील प्रमुख अट आहे की भगवान अय्यप्पा हे ब्रह्मचारी असल्याने वय वर्षे १० ते ५० या वयोगटातील महिलांना (थोडक्यात मासिक पाळीच्या वयातील महिलांना ) प्रवेश बंदी होती आणि ही प्रथा काहीशे वर्षे चालू होती.  २०१८ मध्ये काय झाले ? २०१८ मध्ये इंडियन यंग लॉयर्स असोशिएशन या संस्थेन...