महिलांचे विनापरवानगी फोटो काढणे गुन्हा कधी होतो ? 'प्रत्येक दिवाणी वादाला फौजदारी वळण देता येणार नाही' : Adv. रोहित एरंडे ©️
महिलांचे विनापरवानगी फोटो काढणे गुन्हा कधी होतो ? 'प्रत्येक दिवाणी वादाला फौजदारी वळण देता येणार नाही' ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. सकाळ मनीच्या माध्यमातून या विषयावर दरवर्षी महिलांची आर्थिक साक्षरता आणि आर्थिक सुरक्षितता याबद्दल वेगवेगळे विषयही हाताळले जातात. फसवणूक /त्रास देणे आर्थिक असो वा अन्य कुठली, मानवी इगो हा बरेचदा अश्या फसवणुकीचे कारण असते असे लक्षात येईल तर कधी "व्हिक्टिम कार्ड" खेळून समोरच्याला नामोहरम करण्याचेही पूर्ण प्रयत्न केले जातात. त्यानिमित्ताने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या एका महत्वपूर्ण निकालाची माहिती आपण यावेळी घेऊ. कोण जाणे कोणावर कधी कुठली वेळ येईल !! मोबाईल फोन हा आपल्या शरीराचा जणू एक अवयव असल्यासारखाच जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. It is the finger that pulls the trigger is the culprit and not the gun असे म्हणतात. त्याचप्रमाणे या फोनचा उपयोग कोण कशाकरीता करते यावर बरेच काही अवलंबून असते. आपण पहिले असेल की बऱ्याच जणांना समोरच्या उघडपणे घटनांचे / व्यक्तींचे फोटो काढणे /व्ह...