Posts

Showing posts from March 14, 2026

बक्षीसपत्र करायचे का मृत्युपत्र ? #लोकमत : ऍड. रोहित एरंडे ©

बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना स्वतःच्या मिळकतीचे मृत्युपत्र करून ठेवावे का बक्षीसपत्र करून ठेवावे याबाबत गल्लत होताना दिसून येते. खरेतर या  दोनही  दस्तांची जातकुळी वेगळी आहे.मृत्यूपत्रासाठी कोणताही स्टँम्प द्यावा लागत नाही, त्याचे रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक नाही (तरीही ते जरूर करावे) , लाभार्थ्यांना ते मान्य आहे असे लिहून द्यावे लागत नाही; तर या  तीनही  गोष्टी बक्षीसपत्रासाठी करणे अनिवार्य आहेत.  तसेच मृत्यूपत्राचा अंमल हा ते करणाऱ्याचा  मृत्यूनंतर होतो, तर बक्षीसपत्राद्वारे मिळकतीमधील हक्क आणि अधिकार हे त्या व्यक्तीच्या  हयातीमध्येच तबदील  होतात.   या लेखाद्वारे आपण बक्षीसपत्राबाबत थोडक्यात माहिती घेऊ.   १. स्वतःच्या मालकिची आणि 'अस्तित्वात' (existing) असलेली स्थावर किंवा जंगम मिळकत  बक्षिस पत्राने तबदील ( ट्रान्सफर)  करता येते. जो मिळकत लिहून देतो त्यास डोनर असे म्हणतात आणि ज्याला मिळते त्याला डोनी म्हणतात.  थोडक्यात  जी गोष्ट अस्तित्वात नाही तिचे बक्षीसपत्र करता येत नाही. संपूर्ण मिळकतच  बक्षीस द्यावी लाग...