"सही करण्याआधी खात्री करा.." "नाते आणि व्यवहार ह्यात गल्लत नको.." #लोकमत ॲड. रोहित एरंडे. ©
"सही करण्याआधी खात्री करा.." "नाते आणि व्यवहार ह्यात गल्लत नको.." ॲड. रोहित एरंडे. © कोर्टामध्ये लोकांचे मुखवटे गळून खरे चेहरे बरेचदा समोर येतात. ज्यांना आपण 'आपले' समजत होतो ती लोकं असे कसे वागू शकतात ? असे प्रश्न अनेकदा उपस्थित होतात ज्यावर बरेचदा उत्तर नसते आणि आपले "प्रेम" आडवे येते. "ना ते" वाईक म्हणजे नातेवाईक असे म्हणायची कधीतरी वेळ येते. गमतीने असे म्हणतात की वाटीभर बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अक्कल एका विश्वासघातात येते ! एक दिवस एक आजोबा आमच्या ऑफिस मध्ये आले. म्हणाले, "माझे वय ८५ आहे. मला २ मुले आणि २ मुली आहेत. थोरली मुलगी पुण्यात राहते जी माझ्याकडे बघते, बाकीचे तिघे अमेरिकेत असतात. सगळे पैसेवाले आहेत आणि आपापल्या संसारी सुखी आहेत !.थोरल्या मुलीचा तर स्वतःचा बंगला देखील आहे" . मी म्हंटले , " वा, टाच वूड".. आजोबा म्हंटले -, जरा थांबा " मी एकटाच माझ्या फ्लॅटमध्ये राहतो. पण थोरलीने मला फसविले आहे असे मला वाटते आहे कारण माझ्या फ्लॅटची या वर्षीची प्रॉपर्टी ट...