Posts

Showing posts from April 11, 2026

अविवाहित स्त्री- पुरुषांच्या मिळकतीचे विभाजन कसे होते ? #लोकमत *ॲड.रोहित एरंडे.©*

 अविवाहित स्त्री- पुरुषांच्या मिळकतीचे विभाजन कसे होते ? #लोकमत *ॲड.रोहित एरंडे.©*  ज्येष्ठ नागरिक असलेले एक पुरुष आणि महिला ऑफिस  मध्ये आल्या होत्या. काय काम आहे, असे विचारल्यावर ते गृहस्थ म्हणाले, "सर, आम्ही दोघे सख्खे बहीण भाऊ आहोत आणि दोघेही अविवाहित आहोत, आई वडील जाऊन बरीच वर्षे झाली, त्यांची मिळकत आमच्या दोघांच्या नावावर झाली आहेच आणि आम्ही दोघेही ४-५ वर्षांपूर्वी बँकेमधून निवृत्त झालो आहोत. पण आता आम्हाला आमच्या प्रॉपर्टी, बँक खाती यांची व्यवस्था कशी लावावी हे समजत नाही"..  सामान्यपणे लग्न झालेले जोडपे आले की त्यांना त्यांच्या  मिळकतीचे काय करायचे आहे हे ठरलेले असते. उदा.नवरा बायको एकमेकांनाच मिळकत देतात किंवा मुलांना /नातवंडाना देतात , असा पॅटर्न प्रत्येक घरातील पार्श्वभूमीवर ठरतो. अर्थात असेच करायला पाहिजे असे काही नसते, स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा जो तो मुखत्यार असतो.  तर एखादी मिळकत नावावरहोणे  म्हणजेच त्यामधील मालकी हक्क मिळणे हे त्या व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या न...