Posts

Showing posts from July 31, 2026

जागा नावावर करायचीय म्हणजे काय ? ऍड. रोहित एरंडे ©

जागा नावावर करायचीय म्हणजे काय  ? "संध्या छाया भिववती हृदया " आयुष्याच्या या टप्प्यावर असलेली अनेक जोडपी आमच्याकडे येतात आणि बहुतांशी लोकांचा एकच प्रश्न असतो की "माझी/आमची जागा जोडीदाराच्या /मुलं-मुलीच्या नावावर करायची आहे" किंवा "जरा आमचा इंडेक्स-२ बदलून घ्यायचा आहे" . सध्या  रिडेव्हल्पमेंटचे वारे जोर वाहत आहे त्यामुळे "नवीन फ्लॅटवर मुला -मुलींचे नाव कसे लावता येईल" असेही प्रश्न विचारले जातात.      बहुसंख्य लोकांना असे वाटत असते की, तहसीलदार ऑफिस मध्ये  ७/१२ च्या उताऱ्याला किंवा   प्रॉपर्टी कार्डला नाव लावायचा अर्ज दिला किंवा लाईट बिल, प्रॉरती टॅक्स बिलावर नाव लावले की झाले.  कायदा मात्र वेगळा आहे आणि याची थोडक्यात माहिती घेऊ.     मिळकतीमधील मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या नोंदणीकृत दस्तानेच तबदील केला जाऊ शकतो.  इंडेक्स-२ म्हणजे काय ?  रजिस्ट्रेशन कायदा १९०८ च्या कलम ५५ अन्वये विविध प्रकारचे इंडेक्स (सूची) तयार केले जातात....