Posts

Showing posts from May 21, 2026

इच्छापत्र स्वतःच्याच इच्छेप्रमाणे करणे अपेक्षित, मुलांच्या नाही ! #लोकमत : ॲड. रोहित एरंडे ©

  इच्छापत्र स्वतःच्याच  इच्छेप्रमाणे  करणे अपेक्षित, मुलांच्या नाही  ! #लोकमत   नुकतेच बँकेतून निवृत्त झालेले नवरा बायको ऑफिस मध्ये  इच्छापत्र (विल /मृत्युपत्र ) करण्याबात माहिती घेणयासाठी आले होते.   काका म्हणाले, " आमची सर्व स्थावर जंगम मिळकत ही मी आणि माझ्या पत्नीने बँकेत नोकरी करून कष्टातून कमावली  आहे. आम्हाला एक मुलगा एक मुलगी असून दोघांचीही लग्ने  झाली आहेत". काकू म्हणाल्या, "काही दिवसांपूर्वी आम्ही घरात चर्चा करत होतो की सध्याच्या धकाधकीच्या  काळात  'विल' लवकरात लवकर करावे, आपल्या काही मित्र मंडळीनीं केले आहे", "मात्र    याची कुणकुण लागल्यावर  अचानक मुलगा आणि सून आणि मुलगी आणि जावई स्वत्रंतपणे आमहाला भेटले आणि  त्यांच्या इच्छा काय काय आहेत  हे सांगायला लागले" त्यांचे म्हणणे होते की आमचे जे काही आहे ते त्यांनाच मिळणार त्यामुळे विल कसे करावे, आमच्याच वकीलांकडून करून घेऊ असे बोलायला लागल्यावर आम्हाला जरा वावगे वाटले.. ते काका म्हणाले "आमची टाप नव्हती बुवा आमच्या आई वडिलांशी अश्या बाबत बोलण्या...