Posts

Showing posts from June 15, 2026

चुकीच्या केशकर्तनासाठी लाखोंची नुकसानभरपाई !! ॲड. रोहित एरंडे ©

 चुकीच्या केशकर्तनासाठी लाखोंची नुकसानभरपाई !! ॲड. रोहित एरंडे ©  भारताच्या  सर्वोच्च न्यायालयात कोण-कोणते विषय जाऊ शकतात याची जंत्री काढणे हाच एक संशोधनाचा विषय होईल. कोणाचे काय तर कोणाचे काय असे म्हणतात. असाच एक मजेशीर खटल्यावर   सर्वोच्च न्यायालयाने  नुकताच एक निकाल दिला. ही केस सुरु होते  २०१८ मध्ये.  आय आय एम कलकत्ता येथील पदवीधर असलेल्या आणि नंतर मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये गेलेल्या आशना रॉय नावाच्या मॉडेल   नवी दिल्लीमधील आयटीसी मौर्य या पंचतारांकित हॉटेल मधील ब्युटी पार्लर मध्ये केस कापण्यास आली होती. मात्र तिला पाहिजे तसे केस कापले नाहीत, हेअर स्टायलिस्टने तिच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, केस पाहिजे तेवढे छोटे कापले नाहीत आणि नंतर जी हेअर-ट्रीटमेंट घेतली त्यामुळे तिच्या  टाळूला दुखापत झाली आणि या सर्व   सेवेतील त्रुटींसाठी     आणि वैद्यकीय निष्काळजीपणासाठी    आशना ताईंनी थेट राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे  तब्ब्ल २ कोटींच्या नुकसान भरपाईसाठी दावा दाखल केला आणि तो २०२१ मध्ये मान्य झाला आणि हा ...