विमा रक्कम अपघात भरपाईमधून वजा करता येणार नाही : ॲड. रोहित एरंडे. ©
विमा रक्कम अपघात भरपाईमधून वजा करता येणार नाही ॲड. रोहित एरंडे. © एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यानंतर त्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार, उपचारासाठी झालेला खर्च विमा पॉलिसीतून मिळविण्यासाठी करणारी धडपड आणि कधी कधी अपघात भरपाई मिळण्यासाठी कोर्टात माराव्या लागणाऱ्या चकरा अश्या दिव्यातून जावे लागते आणि ज्यांच्यावर दुर्दैवाने अशी वेळ असेल अशांनाच यातील वेदना समजतील.. तर मोटार अपघात भरपाई न्यायाधिकरण (MACT) कडून मिळणाऱ्या भरपाईतून आरोग्यविमा (Mediclaim )पॉलिसीमधून मिळालेली रक्कम वजा करता येईल का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न नुकताच मा. सर्वोच्च न्यायालायने निकालात काढला. या केसची थोडक्यात पार्श्वभूमी बघू यात. अपघात झाल्यानंतर "अ " व्यक्तीने MACT समोर नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. त्या दाव्यात उत्पन्नात झालेले नुकसान, भविष्यातील उत्पन्नाच्या संधींचे नुकसान, विशेष आहार, प्रवास खर्च तसेच वैद्यकीय खर्च यांसारख्या बाबींचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याच वेळी, याच वैद्यकीय खर्चांसाठी वैद्यकीय विमा (Mediclaim Insurance) अंतर्गत विमा कंपन...