Posts

Showing posts from July 14, 2026

#आखाड #आषाढ - 'आषाढस्य प्रथम दिवसे' ते "आषाढ सासरा" -

 #आखाड #आषाढ - 'आषाढस्य प्रथम दिवसे' ते "आषाढ सासरा"  आज पासून आषाढ  महिना सुरू झाला आहे. मांसाहारी लोकांसाठी हक्काचा असलेला 'आखाड'  हा त्याचा प्रचलित अपभ्रंश आहे.   'आषाढस्य प्रथम दिवसे' ही महाकवी कालिदासाच्या 'मेघदूत' या प्रसिद्ध काव्यातील सुप्रसिद्ध ओळ सर्वांना सुपरिचित आहे. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात 'आषाढस्य प्रथम दिवसे...' अशी होते.  आषाढाच्या पहिल्या दिवशी एका शापीत यक्षाने पर्वताच्या शिखरावर आलिंगन देऊन बसलेल्या   एका मेघाला बघितल्यावर तो मेघ   स्वतःच्या सुळ्यांनी   धडक मारणाऱ्या हत्तीसारखा सुंदर दिसत होता आणि   त्या मेघालाच आपली पत्नीकडे (अलकानगरीत) निरोप पाठवण्यासाठी तो यक्ष दूत बनवतो. या पहिल्या दिवसाच्या वर्णनावरूनच आषाढाच्या पहिल्या दिवशी 'महाकवी कालिदास दिन' आणि 'संस्कृत दिन' साजरा केला जातो.  यक्ष (ज्याला कुबेराने शिक्षा केली आहे).  आपल्या मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रसंगावरून, सणांवरून विविध म्हणी आहेत. त्यातलीच एक म्हणजे  आषाढ सासरा. "आषाढ सासरा : लग्न झाल्यानंतर नव्या...