Posts

Showing posts from July 9, 2026

डॉक्टरांवरील हल्ल्याचा गंभीर आजार - ॲड. रोहित एरंडे ©

  हल्ले डॉक्टरांवर, परिणाम समाजावर.... ऍड रोहित एरंडे. ©  डोंबिवली येथे शिवसेनेच्या नगरसेवकाने आणि रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि नर्स यांच्यावर हल्ला केल्याचे प्रकरण चांगलेच गाजत आहे.  अश्या घटना भारतभर घडत आहेत आणि एका अभ्यासानुसार सुमारे ७०% डॉक्टरांवर कधी ना कधी अशा प्रसंगांना सामोरे जायची वेळ आली आहे, असे क्वचितच कुठल्या इतर देशांत घडत असेल.  डॉक्टर-पेशंट हे नाते दिवसेंदिवस दुष्टचक्रात गुरफटत चालले आहे.  भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी देखील काही वर्षांपूर्वी एका समारंभात ह्याबद्दल चिंता व्यक्त करता नमूद केले होते की असेच जर प्रकार चालू राहिले तर  डॉक्टर औषधाला देखील मिळणार नाहीत.   इतर कुठल्याही प्रोफेशन पेक्षा डॉक्टरांना देवाचे दुसरे रूप म्हणून ओळखले जाते. डॉक्टर जर का देव असेल, तर त्याची विटंबना (हल्ला )करू नका....आणि...डॉक्टर जर का देव नसेल तर, त्याच्या मर्यादा ओळखा. परिस्थती खरंच गंभीर झाली आहे की  "सेव्ह द सेव्हिअर" असे म्हणायची वेळ आली आहे.  जर आता हल्ल्यांचे गैर प्रकार वेळीच रोखले नाहीत , तर त्याचे गंभीर परिणाम...