Posts

Showing posts from July 11, 2026

गृहिणीच्या कामाचे केलेले "सर्वोच्च" मोल ...ॲड. रोहित एरंडे.

 गृहिणीच्या कामाचे केलेले "सर्वोच्च" मोल ... ॲड. रोहित एरंडे. © काही  दिवसांपूर्वी कॉमर्स कॉलेजमधील मित्रमंडळी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो होतो. हास्य विनोद चालू होते.  . घरातली कामे  कोण कोण   करतात ?  असा विषय चालू असताना एक मुलगा म्हणाला, घरकाम हे काही आमचे काम नाही, ते आईचे आहे , मी बाबासारखा मोठा बिझनेसमन होणार, तो खूप काम करतो आणि पैसे कमावतो"... हे वाक्य  ज्यांना सध्या "चुणचुणीत" म्हणतात अश्या मुलाने उच्चारल्यावर  क्षणभर एकदम शांतता पसरली आणि कॉलेज दिवसात टॉपर असणाऱ्या , स्वतःचा   पार्लर सुरु करणार असे नेहमी सांगणाऱ्या त्या  मैत्रिणीच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी आले.    हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे   सर्वोच्च न्यायालयाने दिलेला एक निकाल सध्या खूपच व्हायरल झाल्याचे दिसून आले आणि या निकालाचा अभ्यास करता त्यातील सर्वोच्च न्यायालायने नमूद केलेली निरीक्षणे खूपच महत्वाची आहेत हे  दिसून आले.  एका निकालाच्या निमित्ताने  "गृहिणी या राष्ट्रनिर्मात्या आहेत एवढे त्यांच्या कामाचे महत्त्व आहे. एखाद्या...