विधवा सुनेचे सासरकडील मिळकतीमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे © #लोकमत
विधवा सुनेचे सासरकडील मिळकतीमधील हक्क. #लोकमत ॲड. रोहित एरंडे © आमच्या मुलाचे मागील वर्षी अकस्मात निधन झाले. या धक्क्यातून अजूनही आम्ही सावरलेलो नाही तोच आमची सून आता सतत काहीतरी भांडणे काढून माझ्या संपत्तीमधला हिस्सा मागत आहे, नाहीतर कोर्टात जैन अशी धमकी देत आहे. जी काही संपत्ती आहे ती मी स्वतः कमावलेली आहे. आम्हाला अजून १ मुलगी देखील आहे. सुनेला दुसरे लग्न देखील करायचे आहे. तर सुनेला आमच्या मिळकतीमधील हिस्सा द्यायला लागतो का ? काही लोकं आम्हालाच सुनेविरुद्ध कोर्टात जाण्यास सांगत आहेत ? काय करावे सुचत नाही.. एक त्रस्त वडील आणि सासरे , पुणे. सर्व प्रथम तुम्हाला या दुःखद प्रसंगामधून तुम्हा उभयतांना लवकर सावरण्याची ताकद परमेश्वर देवो. मात्र जेव्हा कायद्याचा प्रश्न येतो तेव्हा सजग असणे गरजेचे असते आणि कायद्यामध्ये भावनांना थारा नाही हे लक्षात घेऊन लवकर पुढची पाऊले उचला. आता तुमच्या प्रश्नाकडे वळू या. सर्वप्रथम ही सर्व मिळक...