Posts

Showing posts from August 11, 2026

गटारी अमावस्या नव्हे तर दिव्याची अवस : ॲड. रोहित एरंडे ©

 गटारी अमावस्या नव्हे तर दिव्याची अवस :  ॲड. रोहित एरंडे © महाराष्ट्राच्या लोकजीवनात अनेक सण, व्रतवैकल्ये आणि परंपरा अशा आहेत की त्यांचा अर्थ केवळ धार्मिक विधीपुरता मर्यादित राहत नाही. त्यामागे सामाजिक, सांस्कृतिक आणि भावनिक अशी अनेक पदरे दडलेली असतात. ‘दिव्याची अवस’ ही अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे. नावाप्रमाणेच या परंपरेच्या केंद्रस्थानी आहे—दिवा -दीप .   महाराष्ट्रात ‘अवस’ हा शब्द सामान्यतः अमावास्येसाठी वापरला जातो.  ‘दिव्याची अवस’ म्हणजे अमावस्येच्या दिवशी दिव्याची पूजा करून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा. काही ठिकाणी तिला ‘दिव्यांची अमावस्या’ असेही म्हटले जाते. या दिवशी घरातील दिवे, समई, पणत्या किंवा प्रकाश देणाऱ्या वस्तू स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते.  मात्र गेले काही वर्षांत या अमावास्येला "गटारी अमावस्या" असे म्हणणे प्रचलित झाले आहे आणि कारण काय तर दुसऱ्यादिवशी पासून श्रावण सुरु होणार आणि मग नवरात्र होई पर्यंत सणांची -धार्मिक कार्यक्रमांची  रेलचेल  असल्यामुळे  आजचा  दिवस जणू   सामिष आहार आण...