Posts

Showing posts from August 15, 2026

नावात काय आहे ? विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? - ॲड. रोहित एरंडे ©

नावात काय आहे ? विवाहानंतर महिलांना नाव बदलणे कायद्याने अनिवार्य असते का ? डिव्होर्सनंतर नाव बदलता येते का ? ॲड. रोहित एरंडे © विख्यात इंग्रजी  लेखक, नाटककार  विल्यम शेक्सपियर यांच्या 'रोमियो आणि ज्युलियेट' (Romeo and Juliet) या अजरामर शोकांतिकेमधील "नावात काय आहे?, गुलाबाला आपण दुसऱ्या कोणत्याही नावाने बोलावले तरी त्याचा सुगंध असाच गोड राहील" हे वाक्य सर्वांना माहिती असेलच.   तर काही दिवसांपूर्वी , लग्नानंतर महिलांनी माहेरचेच संपूर्ण  नाव    ठेवण्याची  वाढती प्रवृत्ती आणि भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या कायदेशीर अडचणी  या बाबत एक लेख वाचण्यात आला आणि हा मेसेज व्हॅट्सऍपवर खूप व्हायरल झाला आणि त्यावरील  चर्चेत लोकांचा बराच डेटा खर्ची पडला. यामध्ये मैल विरुद्ध पुरुषी संस्कृती असेही स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून आले आणि एकंदरीतच बऱ्याच ठिकाणी या विषयावर तिखट चर्चा झाल्याचे दिसून आले. या विषयावर कायदेशीर दृष्टीने लेख लिहिण्याची आमचे ग्रुप कॅप्टन मुकुंदराव लेले यांचेकडून विचारणा झाली आणि म्हणून  हा लेखन प्रपंच.    हा विषय महत्त्व...