#आखाड #आषाढ - 'आषाढस्य प्रथम दिवसे' ते "आषाढ सासरा" -

 #आखाड #आषाढ - 'आषाढस्य प्रथम दिवसे' ते "आषाढ सासरा" 

आज पासून आषाढ  महिना सुरू झाला आहे. मांसाहारी लोकांसाठी हक्काचा असलेला 'आखाड'  हा त्याचा प्रचलित अपभ्रंश आहे.  

'आषाढस्य प्रथम दिवसे' ही महाकवी कालिदासाच्या 'मेघदूत' या प्रसिद्ध काव्यातील सुप्रसिद्ध ओळ सर्वांना सुपरिचित आहे. या काव्याच्या दुसऱ्या श्लोकाची सुरुवात 'आषाढस्य प्रथम दिवसे...' अशी होते.  आषाढाच्या पहिल्या दिवशी एका शापीत यक्षाने पर्वताच्या शिखरावर आलिंगन देऊन बसलेल्या   एका मेघाला बघितल्यावर तो मेघ   स्वतःच्या सुळ्यांनी   धडक मारणाऱ्या हत्तीसारखा सुंदर दिसत होता आणि   त्या मेघालाच आपली पत्नीकडे (अलकानगरीत) निरोप पाठवण्यासाठी तो यक्ष दूत बनवतो. या पहिल्या दिवसाच्या वर्णनावरूनच आषाढाच्या पहिल्या दिवशी 'महाकवी कालिदास दिन' आणि 'संस्कृत दिन' साजरा केला जातो.  यक्ष (ज्याला कुबेराने शिक्षा केली आहे). 

आपल्या मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या प्रसंगावरून, सणांवरून विविध म्हणी आहेत. त्यातलीच एक म्हणजे  आषाढ सासरा.

"आषाढ सासरा : लग्न झाल्यानंतर नव्या सुनेने सासरेबुवांचे  पहिल्‍या आषाढांत तोंड पाहावयाचे नसते म्हणून ती काही दिवस माहेरी किंवा दुसरीकडे जाते, तेव्हा  तिचे देखील  कोणी दुसरा माणूस सासर्‍याप्रमाणेंच तिला बोलू लागला की त्याला 'आषाढ सासरा' म्हणतात.

"खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान" -

खरी सासू केवळ कानच पकडेल, पण आषाढ सासू कानही पकडेल आणि त्याच बरोबर खोट्या मानपानाची अपेक्षाही ठेवेल..

दोघांचा अर्थ, थोडक्यात, दुसऱ्यावर विनाकारण हुकूमत गाजविणारा.

मराठी भाषेत अश्या अनेक म्हणी  आहेत, ज्याची माहिती   आपल्याला असल्यास दुसऱ्यांना करून देण्याचा प्रयत्न करावा. ह्या म्हणींमधील गर्भितार्थ लक्षात घेणे गरजेचे आहे.

 

धन्यवाद 🙏

ॲड. रोहित एरंडे. © 

Comments

Popular posts from this blog

बक्षीस पत्र (Gift Deed)- एक महत्वाचा दस्त ऐवज - ऍड. रोहित एरंडे ©

हक्क सोड पत्र (Release Deed) - एक महत्त्वाचा दस्तऐवज. : ऍड. रोहित एरंडे.©

फ्लॅटमध्ये होणाऱ्या पाणीगळतीचा खर्च कोणी करायचा ? .. ऍड. रोहित एरंडे.©