Posts

Showing posts from August 29, 2026

बसायचा पाट मुलांना देताय ? - ॲड. रोहित एरंडे ©

 "मुलांना, आई-वडिलांच्या स्वकष्टार्जित  घरामध्ये आई-वडिलांच्या  मर्जीवरच राहता येते" #लोकमत स्वतःच्या घरातून, मुलांना बाहेर काढण्याचा आई-वडिलांना अधिकार  ऍड. रोहित एरंडे © "जगी सर्व सुखी असा कोण आहे ?" रामदासस्वामींचे हे बोल कोर्ट प्रॅक्टिसमध्ये पदोपदी अनुभवायला येतात. प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास असतात. मात्र  आयुष्याच्या ज्या  टप्प्यावर मुले सेटल झालेली असतात, नातवंडांबरोबर  मजेत वेळ घालवायचा, अश्या वेळी मात्र काही आई वडिलांवर स्वतःच्या पोटच्या पोरांबरोबर "उभा दावा" मांडावा लागतो. आपण बहुतेक जण जन्मापासून आई-वडिलांबरोबरच  राहतो, ते घर कायद्याने कोणाच्याही नावे असले तरी ते आपण "आपलेच घर आहे" असे म्हणत असतो. मात्र काही वेळा असे प्रसंग येतात की आई-वडिलांना पोटच्या मुलांना सांगवे लागते की घरातून चालते व्हा, हे घर आमचे आहे ! पोटच्या poranshi कोर्टात असे भांडण्याची वेळ ज्या आई-वाडियांवर येते त्यांनाच याचे दुःख विचारा.  हे लिहिण्याचे कारण म्हणजे नुकतेच ४ ऑगस्ट २०२६ रोजी दिलेल्या एका निर्णयामध्ये  मा. सर्वोच्च न...