Posts

Showing posts from August 30, 2026

वाहनाचा दरवाजा निष्काळजीपणे उघडणे अयोग्यच: दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ॲड. रोहित एरंडे ©

  वाहनाचा दरवाजा निष्काळजीपणे उघडणे अयोग्यच: दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय ॲड. रोहित एरंडे ©  रस्त्यावर वाहन चालवताना चालकाने केवळ स्वतःच्या वाहनाच्या हालचालींकडे लक्ष देणे पुरेसे नसते, तर आजूबाजूच्या वाहतुकीचीही योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक असते. विशेषतः रस्त्याच्या कडेला किंवा वाहतुकीच्या मार्गात वाहनाचा दरवाजा उघडताना मागून अथवा बाजूने येणाऱ्या वाहनांची पाहणी करणे ही चालकाची मूलभूत जबाबदारी आहे आणि त्यात कसूर झाल्यास अनवस्था प्रसंग ओढवू शकतो.    दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच एका याचिकेवर निर्णय देताना नमूद केले की, आजूबाजूला न बघता एकदम वाहनाचा दरवाजा उघडल्यामुळे मागून येणाऱ्या व्यक्तीला अपघात  अपघात होणे  हे स्पष्ट व गंभीर निष्काळजीपणाचे कृत्य आहे आणि त्याबद्दल नुकसान भरपाई देण्यास   संबंधित वाहनचालक किंवा विमा कंपनी  बांधील आहेत.  या केसची पार्श्वभूमी थोडक्यात बघू यात.  20 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी सुमारे 3.30 वाजता दिल्लीस्थित २१ वर्षीय रोशन कुमार साहू हे मोटरसायकलवरून   असता  त्यांच्या पुढे चाललेल्य...