Posts

Showing posts from September 10, 2026

डॉक्टरांवरील हल्ल्याचा सामाजिक रोग : ॲड. रोहित एरंडे

 डॉक्टरांवरील   हल्ल्याचा सामाजिक रोग   ॲड. रोहित एरंडे   रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस काम करतात. परिचारिका रुग्णाची सेवा करतात. आपत्कालीन विभागात डॉक्टर स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता गंभीर रुग्णावर उपचार करतात. परंतु उपचाराच्या प्रक्रियेत एखादी अपेक्षा पूर्ण झाली नाही, रुग्णाला तातडीने बेड मिळाला नाही किंवा उपचाराचा अपेक्षित परिणाम झाला नाही, की डॉक्टरांवर हात उचलण्याची प्रवृत्ती वाढत आहे. ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची समस्या नाही; ती संपूर्ण आरोग्यव्यवस्थेच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्या आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात जुलै २०२६ मध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचे प्रकरण  ताजे असतानाच आता पालघर मधील दुसरे प्रकरण उघडकीस आले आहे. योगायोगाने दोघेही   शिवसेना पक्षाशी संबंधित होते. अर्थात कोणता पक्ष /संघटना आहे हे मुद्दे गौण आहेत, आपण पाहिजे तेव्हा कायदा हातात घेऊ शकतो हि प्रवृत्ती धोकादायक आहे. नगरसेवक रमेश सुखऱ्या म्हात्रे आणि त्यांच्या साथीदारांवर डॉक्टर व रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर मारहाण केल्याचा आरोप झाल...