सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी - ग्राहकाच्या खात्यातून रक्कम गेली म्हणून बँक आपली जबाबदारी झटकू शकत नाही. ॲड. रोहित एरंडे©
सायबर फसवणुकीत बँकेचीही जबाबदारी ग्राहकाच्या खात्यातून रक्कम गेली म्हणून बँक आपली जबाबदारी झटकू शकत नाही ॲड. रोहित एरंडे © सोयी तितक्या गैरसोयी म्हणतात तसेच सध्या डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापराबरोबर सायबर फसवणुकीच्या प्रकारणांमध्येही खूप वाढ झाली आहे. बऱ्याचदा "caught unaware " या परिस्थितीत असे फ्रॉड होतात आणि आपल्याला काही समजायच्या आत पैसे गेलेले असतात. तर समजा ग्राहकाने OTP वापरून एखाद्या व्यवहारास मान्यता दिली असेल, तरी बँकेची जबाबदारी पूर्णपणे संपते का ? असा महत्त्वाचा प्रश्न नागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगासमोर नुकताच आला. या केसच्या फॅक्टस महत्वाच्या असून त्यामधून आपणही काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपसूक दिसून येते. तक्रारदार महिलेला ८ जानेवारी २०२३ रोजी एका व्यक्तीने फेडेक्स (FedEx) या जगप्रसिध्द कुरिअर कंपनीचा अधिकारी असल्याचे भासवून फोन केला आणि तिच्या नावाने परदेशी पार्सल आले असून त्यामध्ये पासपोर्ट, ATM कार्ड, ३०० ग्रॅम गांजा आणि लॅपटॉप असल्याचे खोटेच सांगितले आणि पुढे तिला मुंबई पोलिसांश...