Posts

Showing posts from September 26, 2026

मुलाची लिव्ह-इन मधील मैत्रीण आणि फ्लॅटमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

    लिव्ह-इन रिलेशनशिप आणि मिळकतीमधील   हक्क :    आमचा मुलगा एका मुली सोबत  लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये आमच्याच  मालकीच्या एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहे आणि मी असाच राहणार पुढे लग्न करणार नाही  असे तो म्हणतो. आम्ही खूप समजावले, पण काही उपयोग झाला नाही.     मात्र आम्हाला आता आमच्या मिळकतीची चिंता लागून राहिली आहे. उद्या ही  मुलगी आमच्या फ्लॅटमधील  हक्क मागू  शकते का ?, आम्हाला तिला काहीही द्यायचे नाही. त्यातच  आमची   बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाण्याची देखील शक्यता आहे ? तरी    याबद्दल  कृपया मार्गदर्शन करावे ? एक वाचक, पुणे .   दोन पिढींमधली  मतभिन्नता हल्ली प्रकर्षाने जाणवू लागली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिप हा प्रकार आता आपल्याकडे काही नवीन नाही.  दोन सज्ञान  भिन्नलिंगी पण अविवाहित व्यक्तींनी लग्नासारखे एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशन असे व्याख्या हा विषय माहिती नसणाऱ्यांसाठी करता येईल.  मात्र  एखादी गोष्ट कोणाला अनैतिक वाटली तरी ती बेकायदेशीर असलेच असेह...