Posts

Showing posts from October 14, 2026

पतीकडे २ कोटी रुपयांची अवाजवी मागणी करणे ही 'मानसिक क्रूरताच'; छत्तीसगड उच्च न्यायालय.. ॲड. रोहित एरंडे ©

 पतीकडे २ कोटी रुपयांची अवाजवी मागणी करणे ही 'मानसिक क्रूरताच'; छत्तीसगड उच्च न्यायालय..  सध्या डिव्होर्सचे प्रमाण प्रचंड वाढलेले दिसून येते. कधी काळी टॅबू समजला जाणारा - दूर दूर दिसणारा हा विषय उंबरठा ओलांडून घरात कधी शिरला हे समजलेच नाही.. डिव्होर्स हा असा विषय आहे की प्रत्येक केस वेगळी, त्याची पार्श्वभूमी वेगळी. परस्पर संमतीने डिव्होर्स झाला तर त्यातल्या त्यात बरे, पण जेव्हा भांडून डिव्होर्स घ्यायला लागतो, मुलांचे , पोटगीचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा परिस्थिती वेगळी असते. बरं यात काही फक्त महिलाच व्हिक्टिम असतात असे अजिबात नाही. महिलाकेंद्रित कायद्यांचा गैरवापर झालेला देखील बरेचदा दिसून येते.. तर अशाच एका निकालाची, जिथे पत्नीने पतीला कसे छळले हे बघू यात ज्यात शेवटी पतीच्या बाजूने निकाल लागतो..  घटस्फोटाच्या बदल्यात पतीकडे २ कोटी रुपयांची अवाजवी रक्कम मागणे आणि विनाकारण वेगळे राहणे ही पतीसोबत केलेली 'मानसिक क्रूरता' (Mental Cruelty) आहे, असा स्पष्ट निष्कर्ष न्यायालयाने नोंदवला आहे. या आधारावर उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने दिलेला घटस्फोटाचा निर्णय कायम ठेवला आ...

"आई' व्हायचे की नाही हे ठरवायचा हक्क तिचाच !! मदर्सडे च्या निमित्ताने.. ऍड. रोहित एरंडे.©

 "आई व्हायचे  की नाही हे ठरवायचा हक्क तिचाच !! नवरात्रीच्या निमित्ताने... विरोधाभास  हे आपल्या संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. कारण एकीकडे  नवरात्रात "नव दुर्गा" म्हणून तिचे कौतुक करायचे तर दुसरीकडे महिलांवरील अत्याचार अनंत वाढले आहेत तर  महिलांनी मूल जन्माला घालायचे का नाही आणि ठरवले तर प्रसूती कुठल्या पध्दतीने व्हावी, यावर आपला काहीही संबंध नसताना पु.ल. म्हणायचे तसे "मत ' ठोकून द्यायचे असे प्रकार दिसून येतात आणि यामध्ये महिलावर्गच जास्त पुढे असल्याचे म्हंटले तर अतिशोयक्ती ठरणार नाही. भारतात अंदाजे ६५००० पेक्षा जास्त बाळे रोज जन्माला येतात परंतु प्रसूतीची चर्चा होण्यासाठी तुम्ही दीपिका पदुकोण असणे गरजेचे आहे, कारण तिने प्लॅनड सिझर" का केले इथपासून तिची नॉर्मल डिलिव्हरीच कशी व्हायला पाहिजे होती अशी चर्चा इंटरनेटवर रंगली होती. असाच प्रकार मराठी 2   अभिनेत्रींबाबत घडला.  एकीला  लग्नाला 10 वर्षे होऊनी   अजूनही " पाळणा " कसा हलला नाही, म्हणून  ट्रोल व्हावे लागले आणि दुसरीला तिने " मला आत्ता मूल नकोय,  पण मी माझे eggs फ्रिझ कर...