Posts

Showing posts from November 13, 2026

प्रश्न पुनर्विकसनाचे -सामन्यांच्या जिव्हाळ्याचे !! ॲड. रोहित एरंडे ©

प्रश्न पुनर्विकसनाचे -सामन्यांच्या जिव्हाळ्याचे !! ॲड. रोहित एरंडे ©   मुंबई -पुणे सारख्या शहरांमध्ये पुनर्विकासाचे (रिडेव्हलपमेंट) वारे नव्हे, तर वादळच जोरदार घोंगावत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आणि प्रत्येक सोसायटीच्या फॅक्टस वेगळ्या असतात. एक कायदेशीर तत्व कायम लक्षात ठेवावे – एखादी गोष्ट कायद्याने करावीच लागते आणि एखादी गोष्ट करता येते, यामध्ये फरक आहे. उदाहरणार्थ लग्नाचे वय झाल्यावरच लग्न करता येते, याचा अर्थ लग्न करायलाच पाहिजे, असे कायदा सांगत नाही. त्याचप्रमाणे अमुक इतकी वर्षे झाल्यावर पुनर्विकास करावाच किंवा करू नये, असाही काही कायदा नाही. केवळ आपल्या आजूबाजूच्या सोसायट्यांचा पुनर्विकास होत आहे, म्हणून एखाद्या सोसायटीनेही ती प्रक्रिया केलीच पाहिजे, हा विचार चुकीचा आहे. काही वेळा नवीन सोयी सुविधा उदा. लिफ्ट, सोलर, नवीन पाईप लाइन इ. बसवून लोकांचे प्रश्न कमी खर्चातही सुटले आहेत, हेही लक्षात घ्यावे. तर पुनर्विकास आणि विरोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि कुठल्या अडचणी दत्त म्हणून उभ्या राहतील हे सांगता येत नाही त्यामुळे पुनर्विकास पाहावा करून अशी नवीन म्हण ...