सोसायटी रिडेव्हलपमेंट विनाकारण अडवून धरणाऱ्या सभासदाला उच्च न्यायालयाचा दणका : ऍड. रोहित एरंडे. ©
सोसायटी रिडेव्हलपमेंट विनाकारण अडवून धरणाऱ्या सभासदाला उच्च न्यायालयाचा दणका :
ऍड. रोहित एरंडे. ©
बिल्डरने मा. कोर्टाला असेही सांगितले कि इतर सर्व सभासदांना जे फायदे मिळणार आहेत, तेच फायदे श्री. कोंडविलकर ह्यांनाही मिळणार आहेत. हे खूप महत्वाचे आहे.
अखेर कोर्टाने पूर्वीच्या महत्वाच्या निकालांचा आधार घेऊन रिडेव्हलपमेंटच्या बाजूने निकाल दिला आणि कोर्ट रिसिव्हर नेमून श्री. कोंडविलकर ह्यांच्या ताब्यातील जागा देण्याचा हुकूम केला आणि असे नमूद केले कि जर का परत काही आडकाठी केली, तर तो न्यायालयाचा अवमान म्हणून गृहीत धरला जाईल.
"जनरल बॉडीने बहुमताने घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिल्याशिवाय रिडेव्हलपमेंट थांबविता येणार नाही"
उच्च न्यायालयाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निकालाचा आधार घेऊन नमूद केले कि
"एकदा का सोसायटीचे सभासदत्व मिळाले कि सभासदाचे स्वतंत्र असे अस्तित्व उरात नाही आणि काही कायदेशीर अधिकार वगळता सभासदाला हक्क-अधिक इ. साठी सोसायटीमार्फतच बोलता येते. " the stream cannot rise higher than the source " ह्या तत्वाला अनुसरून जनरल बॉडीने बहुमताने घेतलेल्या निर्णयास आव्हान दिल्याशिवाय रिडेव्हलपमेंटच्या निर्णयालाही आव्हान देता येणार नाही आणि त्यामुळे केवळ सोसायटी चेअरमन आणि संचालक मंडळातील एका सभासदानेच ऍग्रिमेंट वरती सही केली, हा बचाव टिकणार नाही." बहुतांशी वेळा सोसायटीतर्फे २-३ अधिकृत पदाधिकारी सही करतात, त्यात गैर काही नाही. येथे एक नमूद करावेसे वाटते कि रिडेव्हलपमेंटच्या निर्णयाला आव्हानच देता येणार नाही असे अजिबात नाही. सबळ करणे आणि पुरावे असतील तर कुठल्याही निर्णयाला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आव्हान देता येते, अर्थात विहित मुदतीमध्ये.
खरेतर आता रिडेव्हलपमेंट बद्दलचा कायदा आता बऱ्यापैकी प्रस्थापित झाला आहे. "बहुमताने घेतलेला निर्णय अल्प मतामधील सभासदांवर बंधनकारक असतो", "स्वतःच्या फायद्याकरिता अल्पमतातील निष्ठाबदलू सभासदांमुले नवीन घराकडे डोळा लावून बसणाऱ्या सभासदांवर अन्याय करणे चुकीचे ठरेल" असे महत्वपूर्ण निर्णय कोर्टानी दिलेले आहेत. अर्थात प्रत्येक केसच्या फॅक्टस वेगळ्या असतात, हेही ध्यानात ठेवले पाहिजे. २००९ साली आलेली मार्गदर्शक तत्वांमध्ये तत्कालीन सरकारने सुमारे २०१८-१९ मध्ये थोडे बदल केले आहेत. आता केवळ ५१% सभासदांच्या बहुमताने देखील रिडेव्हलपमेंटचा विषय मंजूर करता येतो, हा प्रमुख बदल आहे. सर्वात महत्वाचे, वरील निकाल केवळ सहकारी सोसायट्यांसाठी लागू आहेत, अपार्टमेंट साठी नाही.
वरील निकाल महत्वाचा असून अडलेल्या सोसायट्यांसाठी आशेचा किरण आहे.
ऍड. रोहित एरंडे. ©
Nice Information
ReplyDeleteThanks 👍
Deleteछान माहिती मिळते तुमच्याकडून
ReplyDeleteधन्यवाद
धन्यवाद..
Deleteखुप महत्वपूर्ण आधारयुक्त माहिती.
ReplyDeleteThanks
Deleteखूपच छान माहिती.
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखूपच उपयुक्त माहिती
ReplyDeleteधन्यवाद
DeletePl take action just like person who play with life
ReplyDeleteThanks for the information Adv. Rohit Sir,
ReplyDeleteWhat if a Developer whose firm was dissolved has signed the Development Agreement and/or what if managing committee whose term has expired has signed the Development agreement ? and only one member has taken objection and have gone to the court.
Regards
Sir tumcha number milu shakel ka? Society adhikaranbaddal mahiti hvi hoti?
ReplyDeleteSir tumcha number milu shakel ka? Society adhikaranbaddal mahiti hvi hoti?
ReplyDeleteImportant information
ReplyDeleteThis is for society members but can a case be loged for disputed land outside the society which the society claims and the residents as tenants of their society
ReplyDeleteIf 7/12 has the name of Original Owner and society name is inducted in Index 11 which by virtue of conveyance want to prove land owner without Saledeed , Release deed , and without clear title
ReplyDeleteरोहित , नमस्कार
ReplyDeleteही पोस्ट तू मला what's up माझ्या
मोबाइल नंबर 9657073750
पाठवू शकशील का?