Posts

डिव्होर्स नंतर संयुक्त मालकीच्या फ्लॅटची मालकी कोणाकडे ? - ॲड. रोहित एरंडे ©

 डिव्होर्स नंतर संयुक्त मालकीच्या  फ्लॅटची मालकी   कोणाकडे ? आमच्या मुलाच्या आणि सुनबाईंच्या नावावर एक फ्लॅट आहे, मुलाचे नाव पहिले आणि दुसरे सुनबाईंचे. सर्व सुरळीत चालू आहे असे आम्हाला वाटत असतानाच  अचानक त्या दोघांनी परस्पर संमतीने डिव्होर्स घेणार असल्याचे जाहीर केल्यामुळे आम्हा उभयतांवर जणू डोंगरच कोसळला आहे. त्यातून आम्ही मार्ग काढायचा प्रयत्न करत आहोतच. पण जर डिव्होर्स झाला तर या फ्लॅटची मालकी त्याचे नाव पहिले असल्याने मुलाकडे जाईल का ? दोघेही चांगले शिकलेले आणि चांगल्या नोकरीत आहेत.  कदाचित आमची बिल्डिंग रिडेव्हल्पमेंटला देखील जाईल, त्यामुळे काय करावे लागेल ? एक त्रस्त  पालक., पुणे.  सध्या समाजाचे  आणि त्यातही सुशिक्षित कटुंबांचे  डिव्होर्स - घटस्फोट हे व्यवच्छेदक लक्षण म्हणावे लागेल एवढे हे प्रमाण वाढते आणि चिंताजनक आहे. काल परवा पर्यंत दूरवर कोणाच्या तरी बाबतीत घडणारा डिव्होर्स हा त्याचे "टॅबू -पण" सोडून आपल्या दारापर्यंत कधी येऊन ठेपला हे बदलत्या सामाजिक परिस्थितीमुळे कळलेच नाही. डिव्होर्सची करणे हि व्यक्ती प्रमाणे बदलत असतात आणि...

माफीचे साक्षीदार.... ॲड. रोहित एरंडे ©

  माफीचे साक्षीदार.... ॲड. रोहित एरंडे © दयेची याचिका फेटाळून ७ वर्षांनंतरही फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस अवास्तव आणि अनावश्यक  उशीर झाल्याने आरोपींच्या   घटनात्मक  अधिकारांचे उल्लंघन झाले आहे  आणि अशा  उशीरामुळे त्यांच्यावर  अमानुष परिणाम होतो, या कारणास्तव नुकत्याच दिलेल्या निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयच्या  न्या. अभय ओका, न्या. अमानुल्ला आणि न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या  खंडपीठाने    पुण्यात हिंजवडी येथेही एका कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यावर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅब  चालकाची आणि त्याच्या   साथीदाराच्या  फाशीच्या शिक्षेचे  ३५ वर्षांच्या जन्मठेपेत रूपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय  कायम ठेवला. सुमारे २ वर्षांपूर्वी याच उशिरास्तव  माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांच्या मारेकऱ्यांनाहि  सर्वोच्च न्यायालयाने 'माफी' दिल्याने प्रतिक्रियांचा आगडोंब उसळला होता.  आपल्याला आठवत असेल तर "निर्भया" बलात्कार प्रकरणातील नराधमांना नृशंस घटनेनंतर  ७ वर्षांनी द...

प्राणीप्रेम कायद्यापेक्षा मोठे नाही. ॲड. रोहित एरंडे ©

प्राणीप्रेम कायद्यापेक्षा मोठे होऊ शकत नाही. ॲड. रोहित एरंडे ©  प्रश्न : आमच्या  सोसायटीमध्ये  आम्ही ज्या फ्लॅट मध्ये राहतो त्याच्या राहणाऱ्या एका सभासदाने त्याच्या  खिडकीमध्ये कबुतरांना दाणा -पाणी देण्यासाठी  , एक ट्रे बसवला आहे.  त्यामुळे आमच्या गच्चीमध्ये   कबुतरांची घाण, पिसे, दाणे असा कचरा होतो. या सभासदांना हा प्रकार थांबविण्यास सांगितला तर ते म्हणतात, हे पुण्याचे काम आहे. दुसऱ्या सभासदाने घरातच २ कुत्रे पाळले आहेत, जे सारखे भुंकत असतात आणि त्याचे मालक त्यांचे अतोनात लाड करतात आणि या प्रेमापोटी जिन्ह्यात केलेली घाण सुध्दा ते नीट साफ करत नाहीत त्यामुले सतत एकप्रकारचा नकोसा वास येत असतो. .   सोसायटी पदाधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. या सर्वाचा आम्हाला आणि इतर सभासदांनाही खूप त्रास होत आहे   तरी या बाबत कृपया मार्गर्दशन करावे.. एक वाचक पुणे.  पु.ल. ज्यांना "पाळंदे" असे मजेने संबोधायचे   असे    प्राणी पाळणारे मोजके लोक आणि इतर सभासद यांच्यामध्ये वादावादी होतेच. सर्व प्रथम त्या सभासद महाशयां...

सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स झालानसल्यास पुनर्विकासाचा मार्ग खडतर. : ॲड. रोहित एरंडे ©

 सोसायटीच्या नावे कन्व्हेयन्स झाला नसल्यास पुनर्विकासाचा मार्ग खडतर.   प्रश्न : आमची ३०-४० वर्षे जुनी सोसायटी आहे आणो आता बिल्डिंगची अवस्था बघता आणि सोयी-सुविधांचा अभाव असल्याने पुनर्विकास करण्याचे ठरत आहे. परंतु अद्याप सोसायटीच्या  नावे कन्व्हेयन्स झालेला नाही. तरी आम्हाला पुनर्विकास करता येईल किंवा कसे ?   सोसायटी सभासद, पुणे.  उत्तर : सर्व प्रथम  कन्व्हेयन्सचा अर्थ थोडक्यात  समजावून घेऊ. कन्व्हेयन्सचा अर्थ एखाद्या जागेमधील मालकी हक्क दुसऱ्याच्या नावे तबदील करणे, थोडक्यात खरेदी खत असे म्हणता येईल. भारतामध्ये 'ड्युअल ओनरशिप' हि पद्धत असल्यामुळे  जमिनीचा मालकी हक्क एकाकडे आणि त्यावरील इमारतीची मालकी दुसऱ्याकडे असू असते, आपल्याकडे सहसा अशी पद्धत असते, कि जमीन मालक हा बिल्डर बरोबर डेव्हलपमेंट ऍग्रिमेंट करतो ज्यायोगे बिल्डर बिल्डिंग बांधतो. त्याच दरम्यान कायद्याप्रमाणे युनिट / फ्लॅट विकत घेणाऱ्यांबरोबर बिल्डरला लेखी करारनामा करणे क्रमप्राप्त असते आणि  नंतर सोसायटी किंवा अपार्टमेन्ट स्थापन करण्याची जबाबदारी बिल्डरवरती असते. सोसायटी आणि ...

"फ्लॅटचे बुकिंग कॅन्सल केल्यास सर्व पैसे परत द्यावेत" - : ॲड. रोहित एरंडे ©

"फ्लॅटचे  बुकिंग कॅन्सल केल्यास सर्व पैसे परत द्यावेत" -  महारेरा प्राधिकरण : ॲड. रोहित एरंडे © असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ नागरिक असलेल्या  श्री. किशोर छेडा यांच्या बाबतीत २०१७ साली घडला. श्री. किशोर छेडा- तक्रारदार यांनी गोदरेज प्रॉपर्टीज च्या कुर्ला, मुंबई येथील "द ट्रीज, ओरिजिन्स " या मोठ्या गृहप्रकल्पात सूमारे ४. ४० कोटी रुपये किंमत असलेला एक प्रशस्त फ्लॅट बुक केला आणि बिल्डर-कंपनीने सांगितल्याप्रमाणे त्यांनी बुकिंग-रक्कम म्हणून रु. १५ लाख रुपये  भरले आणि पैसे मिळाल्याचा ई-मेल देखील कंपनीने ५ मे  २०१७ रोजी तक्रारदारांना पाठवला. तदनंतर,   'अचानक उद्भवलेल्या घरगुती अडचणींमुळे पुढील पैसे भरणे मला शक्य नाही, सबब फ्लॅटचे बुकिंग रद्द करावे आणि मी भरलेले रु.१५ लाख रुपये परत करावे" अश्या  आशयाचा एक ई-मेल  दि.  ८ मे २०१७ रोजी तक्रारदारांनी कंपनीला पाठवला. मात्र हा ई-मेल मिळूनही कंपनीने तक्रारदारांना पुढील हप्ते वेळेत भरा या आशयाचा ई-मेल पाठवला. त्यावर तक्रारदारांनी आधीच्या बुकिंग रद्द करण्याचा ई-मेल चा संदर्भ देऊन परत एकदा रक्कम परताव्याची मा...

रिडेव्हलपमेंट : नवीन फ्लॅट मुलांच्या नावावर कसा करायचा ? ॲड. रोहित एरंडे ©

  रिडेव्हलपमेंट : नवीन फ्लॅटवर मुलांचे नाव लावायचेय ?  ॲड. रोहित एरंडे © आमच्या  सोसायटीमध्ये  आमचा ज्येष्ठ मंडळींचा ग्रुप आहे. सोसायटी आता रिडेव्हलपमेंटला  जाणार आहे. आमच्या पैकी अनेकांना नवीन मिळणाऱ्या फ्लॅटमध्ये मुलाचे /मुलीचे नाव घालण्याची इच्छा आहे. त्यासाठी डेव्हलपमेंट ऍग्रिमेंटमध्ये च मुलांचे नाव घातले तर चालेल का ? का अजून काही करणे गरजेचे आहे ?   ज्येष्ठ नागरिक ग्रुप , पुणे.  तुमच्या सारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या तरुणपणी  कष्टाने घेतलेल्या फ्लॅटचे रिडेव्हलपमेंटमुळे आता चीज होईल असे म्हणण्यास हरकत नाही. मात्र अश्या नवीन , मोठ्या क्षेत्रफळाचा आणि आधुनिक सोयी सुविधांनी मिळणार फ्लॅटमध्ये  आपल्या मुला -मुलींचे  किंवा आपल्या जोडीदाराचे नाव त्यात घालावे अशी इच्छा अनेकांना दिसून येते, पण नक्की काय करायचे हे लक्षात येत नाही आणि म्हणून अनेकांना  पडणारा प्रश्न आपण विचारलात या बद्दल आपले आभार.       एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही २ किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत,...

"मृत्यूपत्राने मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित समजली जाते " - ॲड. रोहित एरंडे. ©

"मृत्यूपत्राने मिळालेली मिळकत स्वकष्टार्जित समजली जाते "  मला माझ्या वडिलांकडून मृत्युपत्राने एक फ्लॅट मिळाला आहे. माझ्या हयातीमध्ये  या फ्लॅटमध्ये माझ्या  बायकोचा आणि मुलांचा हक्क येतो का ? तसेच सोसायटी मध्ये वडिलांच्या संपूर्ण मृत्युपत्राची प्रत देणे गरजेचे आहे का ? का  फक्त त्या फ्लॅटचा उल्लेख असलेले मृत्युपत्रामधील पान दिले तरी चालेल, कारण इतर मजकुराशी सोसायटीचा संबंध येत नाही. कृपया मार्गदर्शन करावे.  एक वाचक,  पुणे.   मृत्युपत्राइतकी भिती, गैरसमज इतर कोणत्याही कायदेशीर दस्ताबद्दल दिसून येत नाहीत. आधी हे लक्षात घ्यावे कि  एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा कुठल्याही दोन  किंवा अधिक  व्यक्तींच्या हयातीमध्ये  नोंदणीकृत - खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाटप-पत्र यांसारख्या  दस्ताने तबदील केला जाऊ शकतो. तर  एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिळकतीमधील मालकी हक्क हा मृत्यूपत्राने किंवा मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा हक्काने  तबदील होऊ शकतो.    मृत्यूपत्राप्रमाणे मालकी हक्क हा मात्र मृत्यूपत्र करणारी व्यक...

पुनर्विकास करण्यासाठी अपार्टमेंटची सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही. ॲड. रोहित एरंडे. ©

  पुनर्विकास करण्यासाठी  अपार्टमेंटची   सोसायटी करणे कायद्याने बंधनकारक नाही. ॲड. रोहित एरंडे. © आमची ५० लोकांची अपार्टमेंट आहे. बिल्डिंगला सुमरे ३० वर्षे झाली आहेत, पण बिल्डिंगची स्थिती उत्तम आहे. आमच्या इथे नव्याने राहायला आलेले २-३ सभासद आता अपार्टमेंट असणे चांगली नाही, अपार्टमेंटचा पुनर्विकास होऊ शकत नाही, त्यासाठी सोसायटी करणे गरजेचे आहे, नाहीतर जुना बिल्डर हक्क सांगेल  असा प्रचार करायला लागले आहेत आणि त्यामुळे काही ज्येष्ठ सभासद उगाचच घाबरले आहेत. अपार्टमेंटची सोसायटी करण्यासाठी काही लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे ते सांगत आहेत. तरी नुसत्या अपार्टमेंचा पुनर्विकास होऊ शकत नाही का ? का त्यासाठी सोसायटी करणे गरजचे आहे ? यासाठी काय तरतुदी आहेत ?   काही ज्येष्ठ नागरिक, पुणे.  आपण विचारलेला प्रश्न सध्या अनेक ठिकाणी डोके वर काढतो आहे असे दिसून येते आणि याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज दिसून येतात.   पहिली गोष्ट म्हणजे तुमचे जे सभासद अपार्टमेंट चांगली नाही असे आता म्हणत आहेत, त्यांनी मग एखाद्या  सोसायटीमध्येच फ्लॅट का नाही घेतला ? असो....

आई-वडिलांना त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय करायचे हे ठरविण्याचा पूर्ण अधिकार.. ॲड. रोहित एरंडे. ©

 आई-वडिलांना त्यांच्या स्वकष्टार्जित मिळकतीचे काय  करायचे  हे ठरविण्याचा  पूर्ण अधिकार..  ॲड. रोहित एरंडे. © "सर, मी आई- वडिलांबरोबर राहतो, त्यांची देखभाल करतो, धाकटा भाऊ दुसरीकडे राहतो त्यामुळे आमच्या सोसायटीचा पुनर्विकास झाल्यावर जो नवीन फ्लॅट मिळेल तो आई-वडिलांनी मलाच द्यायला हवा.. " या सारखे संवाद  सध्या बऱ्याचदा वकीलांच्या ऑफिसमध्ये घडत असतात.  कोर्ट हे असे ठिकाण आहे जिथे लोकांचे मुखवटे दूर होऊन खरे   चेहरे समोर येतात आणि प्रॉपर्टी असली तरी त्रास, नसली तरी त्रास, अश्या परस्पर विरोधी घटना कोर्टात बघायला मिळतात. "वंध्यत्वं तु समीचीनं कुपुत्रो दुखःदायकः " म्हणजे "एकवेळ संतती नसली तरी  चालेल, पण कुपुत्र (कुपुत्री ) अत्यंत दुःख देणारा ठरतो" अश्या आशयाचे वचन श्रीभागवत महापुराणामध्ये आढळून येते.  त्यामुळे असे वाद जर 'आई-वडील विरुद्ध मुले' किंवा सख्ख्या भावंडामध्ये  असतील आणि प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मिळावा म्हणून मुले जर आई-वडिलांचा छळ करत  असतील तर त्याला वेगळे स्वरूप प्राप्त होते.  आई-वडील आणि मुले एकत्र राहतातआणि जो पर्...

पत्नीच्या मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे. ©

पत्नीच्या मिळकतीचे वारस कोण ?  ॲड. रोहित एरंडे. © सर, तुमचे आणि म.टा. चे विशेष आभार. या लेखमालेमुळे अनेक शंका घरबसल्या सुटायला मदत होते. मागच्या आठवड्यातील तुमच्या लेखाला अनुसरून प्रश्न विचारतो की समजा पत्नी आधी मयत झाली तर तिच्या नावावर असलेली मिळकत पतीलाच मिळते की तिच्या मुलाबाळांचा आणि माहेरच्या लोकांचा काही हक्क असतो ?. एक वाचक पुणे.  सर्वप्रथम आपले आभार की आमच्या लेखमालेमुळे लोकांना त्यांचे कायदेशीर प्रश्न सुटायला मदत होत आहे हे वाचून संतोष वाटला. असो. आता याबाबत कायदेशिर तरतुदी का आहेत यांचा थोडक्यात आढावा घेऊ. स्त्रिया मिळकतीच्या पूर्ण मालक ! हिंदू वारसा कायद्याच्या कलम १४ अन्वये स्त्रियांना एखादी स्थावर / जंगम मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखात अश्या दस्तांनी, स्त्रीधनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती स्त्री अश्या मिळकतींची संपुर्ण मालक होते. ह्याला अपवाद म्हणजे अश्या दस्तांनी जर मिळकतींमध्ये फक्त तहहयात राहण्याचा हक्क (life interest ) दिला असेल तर त्यामध्ये असा मालकी हक्क मिळत नाही. आता तुम...

गाडी विकणाऱ्यांना सर्वोच्च दिलासा ! ऍड. रोहित एरंडे ©

गाडी विकणाऱ्यांना सर्वोच्च दिलासा ! ऍड. रोहित एरंडे © नवीन गाडी घेताना बऱ्याचदा जुनी गाडी एक्सचेंज केली जाते आणि   गाडीचे पैसे दिले-घेतले जातात. आर. टी.ओ फॉर्म्स वरती सह्या देखील कार-एक्सचेंज करणाऱ्यांकडून घेतल्या जातात, पण एकतर ती गाडी पुढे   कधी विकली जाईल हे माहिती नसते आणि विकली गेल्यावर देखील  आर.टी.ओ  रेकॉर्डमध्ये वाहन मालक म्हणून नवीन मालकाचे नाव बदलले गेले आहे  का हे तपासण्याचे  देखील बहुतांशी लोकांच्या गावी नसते. कारण   गाडीचा अपघात झाला तर आर. टी.ओ रेकॉर्ड सदरी ज्याचे नाव मालक म्हणून नोंदविले गेले आहे त्याच्यावर ते उत्तरदायित्व येते. मोटर वाहन कायद्याच्या कलम २(३०) प्रमाणे ज्या व्यक्तीच्या नावाने रजिस्ट्रेशन झालेले असते, तीच व्यक्ती गाडीची मालक समजली जाते. याला अपवाद म्हणजे ती व्यक्ती अज्ञान असेल तर किंवा हायर-पर्चेस कराराने गाडी घेतली असेल तर अनुक्रमे त्या व्यक्तीचा पालक आणि ज्याच्या ताब्यात गाडी असेल ती व्यक्ती मालक समजली जाते. नुकसान भरपाई मागणाऱ्या व्यक्तीला नुकसान भरपाई मिळणे सोपे जावे आणि रजिस्टरला नोंद न झालेल्या वेगवेगळ्या तथाकथीत गाड...

पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ? ऍड. रोहित एरंडे.©

 पतीच्या मृत्यूनंतर त्याची मिळकत कशी विभागली जाईल ? ऍड. रोहित एरंडे.© आमच्या   बिल्डिंगचे आता पुनर्विकासाचे ठरत आहे.  त्यामध्ये माझ्या आणि माझ्या पतीच्या  नावे एक फ्लॅट आहे. माझ्या पतीचे मागच्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नव्हते.  मूळ ऍग्रिमेंट मध्ये पहिले नाव माझ्या पतीचे आणि दुसरे माझे आहे. त्यामुळे आता त्यांचा हिस्सा बायको म्हणून मला एकट्यालाच मिळेल,  का आमच्या दोन्ही मुलांना त्यात काही हिस्सा मिळेल आणि हेच नवीन फ्लॅटला हि लागू होईल का  ? एक वाचक, पुणे  आपल्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो. तसेच अनेक गैरसमज असा आहे कि पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली कि आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो.  एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र, वाट...

जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही. . दरवर्षी ३ नोव्हेंबरला हे दोन दुर्धर प्रसंग आठवतातच ऍड. रोहित एरंडे.

 जिवंतपणीच दोन पुनर्जन्म... काळ आला होता, पण वेळ नाही. . दरवर्षी ३ नोव्हेंबरला हे दोन दुर्धर प्रसंग आठवतातच  ऍड. रोहित एरंडे. © मरणानंतर पुनर्जन्म असतो की नाही हा वादाचा विषय असू शकतो.. परंतु जिवंतपणी पुनर्जन्म मिळू शकतो ? उत्तर आहे होय आणि योगायोगाने दोन्ही घटनांची तारीख होती ३ नोव्हेंबर. पहिली घटना आहे माझे सासरे आणि पुण्यातील प्रख्यात वकील श्री. पी.पी. परळीकर ह्यांच्या बाबतीतील. सुमारे २००६ साली त्यांना लिंफनोड (N H L) च्या कॅन्सरचे निदान झाले. त्याचे केमो - रेडिएशन असे उपचार सुरू झाले. ह्या उपचाराचे काही साईड एफिकेट्स असतातच. त्याचाच परिपाक म्हणजे सासऱ्यांना एक दिवस अचानक cardiac arrest आला आणि ते घरीच कोसळले. घरच्यांनी आणि शेजारच्या सहस्रबुद्धे काकांनी ( सकस वाले) पटकन त्यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये हलविले, परंतु हे १० मिनिटांचे अंतर देखील त्यावेळी काही तासांचे वाटत होते. तिकडे लगेचच उपचार सुरू झाले, परंतु त्यांचे हृदय जवळ जवळ बंद पडले होते, नाडी लागत नव्हती. डॉक्टरांनी २ शॉक देवून सुध्दा हृदय सुरू झाले नाही आणि स्क्रीन वरती फ्लॅट लाईन आली. त्यावेळचे तेथील आय सी य...

एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? - ऍड. रोहित एरंडे ©

एकत्र केलेल्या फ्लॅटसाठी किती मेंटेनन्स घ्यावा ? नमस्कार. आमच्या सोसायटीमध्ये आमच्यासारखे २० एक सभासद असे आहेत ज्यांनी  २ फ्लॅट एकत्र केले आहेत. बिल्डरनेच तसे करून दिले आहेत. मात्र करारनामे वेगळे आहेत. पण असे दोन फ्लॅट घेऊन एकत्र करून त्यात एकच कुटुंब रहात असेल  कमिटीचे म्हणणे आहे कि मेंटेनन्स २ फ्लॅटचाच  घ्यावा लागेल  आणि त्यासाठी ते कायदेशीर सल्ला घेणार आहेत. तर  तर सोसायटीने मेंटनन्स एकाच फ्लॅटचा घ्यावा कि दोनचा, याबाबत जनरल बॉडीने एकच मेंटेनन्स घ्यायचा ठरविला तर ? कमिटीचे म्हणणे बरोबर आहे का आणि त्यांना कायदेशीर सल्ला घेता येईल का ? एक वाचक. पुणे  सोसायटी आणि सभासद ह्यांच्यामधील वादांचे मूळ कारण हे बहुतेक वेळा आर्थिक विषयाशी संबंधित असते. आपण एकात एक अनेक प्रश्न विचारले आहेत आणि त्याचे उत्तर थोडक्यात द्यायचे प्रयत्न करतो. आपल्यासारखे प्रश्न अनेक ठिकाणी दिसून येतात.  बऱ्याचदा लोकांना हे लक्षात येत नाही कि कायदा आपल्याला आवडेल असा असतोच असे नाही. बिल्डर कडून  फ्लॅट  घेताना जेव्हा २ स्वतंत्र  करार केले याचाच अर्थ ते मंजूर नकाशावरती...

सभासदांचे कौटुंबिक वाद पुनर्विकास थांबवू शकत नाहीत. ऍड. रोहित एरंडे ©

 सभासदांचे कौटुंबिक  वाद पुनर्विकास थांबवू  शकत नाहीत.   ऍड. रोहित एरंडे ©  आमच्या सोसायटीची पुनर्विकास प्रक्रिया नियमाप्रमाणे सुरु होऊन डेव्हलपरची  देखील बहुमताने निवड झाली आहे. परंतु २ सभासद असे आहेत कि फ्लॅटची मालकी कोण यामध्ये वारसांमध्ये  वाद चालू आहेत आणि एका सभासदाने तर वाटपाचा दावा केला आहे. परंतु या वादामामुळे हे सभासद कशावरही सही करायला तयार नाहीत आणि फ्लॅटचा ताबा द्यायलाही तयार नाहीत. तर अश्या सभासदांविरुध्द काय करता येईल ?    कमिटी सदस्य, पुणे  पुनर्विकास (रिडेव्हलपमेंट)  आणि विरोध या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.   हा निर्णय  पारदर्शकपणे आणि आपापल्या गरजांचा साधक बाधक  विचार करून घ्यायचा असतो यात काही शंका नाही. परंतु तो निर्णय घेणे आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणणे या मधले अंतर किती असेल हे काही सांगता येत नाही, याच्याशी या विषयावर काम करणारे लोक सहमत होतील. पुनर्विकासाला विरोध करण्याची अनेक कारणे असतात. परंतु अशा विरोधी  या मानसिकतेला न्यायालयांनी आपली अनेक निकालांमधून चपराक लगावताना नमू...

पुनर्विकास : नवीन फ्लॅट कुठल्या मजल्यावर मिळावा ? ऍड. रोहित एरंडे

पुनर्विकास : नवीन फ्लॅट कुठल्या मजल्यावर मिळावा ?  आमच्या  ४० सभासदांच्या   सोसायटीमध्ये २ बीएचके आणि ३ बीएचके असे वेगवेगळे फ्लॅट आहेत. आता रिडेव्हलपमेंटसाठी  बिल्डरची   नेमणूक झाली आहे. नवी इमारतीमध्ये काही सभासदांनी जादा एरिया विकत घेण्याची तयारी दाखविली आहे तर काहींचा अजून विचार चालू आहे. या सर्व बाजूंचा विचार करून बिल्डरने ३-४ प्रकारच्या  फ्लॅटचे डिजाईन दिले. सर्व सूचनांचा  अनेकवेळा विचार करून   विशेष सभेमध्ये  Allotment फायनल करून घेतली. यामध्ये ४-५ महिने गेले आहेत.  मात्र आता एक ग्रीडचे सभासद Allotment मान्य  नाही असे म्हणत आहेत  आणि रोख आमच्यावर आहे.   आता बिल्डर देखील डिझाईन बदलता येणार नाही असे म्हणत आहे.   तरी या बाबत कसा मार्ग काढावा ? कायदा काय सांगतो ?  त्रस्त   मॅनेजिंग कमिटी सदस्य, पुणे  "लग्न पाहावे करून आणि घर पाहावे बांधून"  यासारखी  आता रिडेव्हलपमेंट म्हणजेच पुनर्विकास पाहावे करून अशी नवीन म्हण तयार करता येईल.  कारण पुनर्विकास प्रक्रिया सुर...

मुलांचे खेळ आणि नियमावली : ऍड. रोहित एरंडे ©,

 मुलांचे खेळ आणि नियमावली ..  सर आमच्या सोसायटीत एक  common garden व children play area आहे. तिथे लहान मुलांसाठी घसरगुंडी व झोपाळा आहे. काही झाडे पण तेथे लावली आहेत. सोसायटीत क्रिकेट व फुटबाॅल खेळण्यास बंदी आहे. तरी काही 7 वी 8 वीतील मुले त्याच्या बाजुला असलेल्या drive away किंवा इमारत व  garden च्या मधे फुटबाॅल खेळतात. मध्यंतरी  त्यावरुन वादावादी झाली कारण एका लहान मुलाला बाॅल लागला असता. त्यावर काही सभासदांचे म्हणणे आहे की मधल्या गार्डनच्या जागी झाडे कापुन नेट लावुन तो Area cover करुन मुलांना खेळायला जागा करायची. असे कायद्याने सोसायटी करु शकते का? कारण काही सभासदांचा ह्याला विरोध आहे.  एक वाचक, पुणे :  आपल्या प्रश्नाच्या निमित्ताने  आदर्श उपविधी १६८ याचा उल्लेख करणे गरजेचे आहे आणि तो सर्वांच्या माहितीकरिता खाली उद्धृत केला आहे. या नियमावर कधी लिहायला लागेल असे वाटले नव्हते. असो.  १६८ - संस्थेच्या आवारात खेळ खेळण्यावर निर्बंध : संस्थेची इमारत  / इमारती यांचे स्थान  लक्षात घेऊन तसेच इमारतीचा परिसर आणि संस्थेच्या सदस्यांना आणि त्यांच...