Posts

सासऱ्याच्या मिळकतीमध्ये नणंदेचे हक्क किती ?: ॲड. रोहित एरंडे ©

 सासऱ्याच्या मिळकतीमध्ये नणंदेचे हक्क किती ? सर आमच्या घरात माझ्या  ३  नणंदा   आहेत. एक अहिवाहित आहे आणि दोघींची लग्ने झाले आहेत. माझे यजमान सर्वात छोटे आहेत.  माझे सासरे नुकतेच अचानक मयत झाले. त्यांनी इच्छापत्र केलेले नव्हते. त्यांच्या नावावर बरीच मिळकत होती, मात्र सासूबाई आणि ३  नणंदा यांचेच आमच्याकडे चालते   माझ्या यजमानांनी तिन्ही बहिणींसाठी खूप कष्ट केले, मात्र त्यांच्या सध्या स्वभावाचा फायदा घेऊन  ते सर्व एक झाले आहेत. सासूबाईंनी परस्पर ३ बक्षीसपत्रे करून ३  नणंदा यांना  सासऱ्यांची एक एक प्रॉपर्टी देऊन टाकली.  आता आम्ही काय करावे ? आमच्या मुलाबाळांना काहीच मिळणार नाही का ? एक वाचक, पुणे जिल्हा   ऍड. रोहित एरंडे.©   नणंद म्हणजेच नवऱ्याची बहीण या व्यक्तिरेखेचे बऱ्याच घरात वर्चस्व असते आणि सुनांविरुध्द होणारी घरगुती भांडणे, हिंसाचार यामध्ये नणंद -सासू यांची जोडी असल्याचे दिसून येते आणिवर्तमानपत्रामध्ये अश्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील.   नणंद म्हटल्यावर "सत्वर पाव ग मला, भवानी आई रोडगा  वाहि...

बंगलो सोसायटी आणि रिडव्हलपमेंट : ॲड. रोहित एरंडे. ©

 बंगलो सोसायटी आणि रिडव्हलपमेंट : ॲड. रोहित एरंडे. © आमच्या बंगलो सोसायटीमध्ये  ९९९ वर्षांच्या लीजने दिलेल्या प्लॉटवर  सभासदांनी बंगले बांधले आहेत. आता  काही सभासदांना बंगले पाडून /२  प्लॉट एकत्र करून करून  रिडव्हलपमेंट करायचे आहे.    सोसायटीच्या  नियमांप्रमाणे जास्तीत जास्त १+३ एवढेच बांधकाम करता येते, तर काही सभासदांच्या मते  मिळणाऱ्या   एफएसआय  प्रमाणे जास्तीत  जास्त बांधकाम करता यायलाच पाहिजे.   काही सभासदांचा या रिडव्हलपमेंटलाच विरोध आहे.  नवीन बिल्डिंगची सोसायटी करता येते का ?याबाबत कृपया मार्गदर्शन करावे.  एक वाचक, पुणे  आपल्यासारखे प्रश्न हे अश्या  अनेक बंगलो सोसायट्यांमध्ये सुरु झाले आहेत  आणि प्रत्येकाच्या फॅक्टस वेगळा असू शकतात आणि या प्रश्नांचा  विस्तृत उहापोह जागेअभावी येथे करणे शक्य नाही.       असो. तरीही     आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने   काही कायदेशीर संकल्पना समजून घेणे भाग आहे. पाश्चात्य देशांमध्ये ज्याची जमीन तोच त्...

देखभाल खर्च (Maintenance ): किती दिवसांत द्यावा ? उशीर झाल्यास दंड किती आकारता येतो ? ॲड. रोहित एरंडे. ©

 देखभाल खर्च : किती दिवसांत द्यावा   ? उशीर झाल्यास दंड किती आकारता  येतो ? ॲड. रोहित एरंडे. © आमच्या सोसायटीमध्ये दरमहा मेन्टेनन्स ची रक्कम गेल्या मीटिंगमध्ये वाढवून तीन हजार रुपये केलेली आहे. दरमहा येणाऱ्या महिन्याच्या दहा तारखेच्या पुढे जर कोणत्या सभासदाने पैसे उशिरा दिले तर त्याला आमच्याकडे शंभर रुपये दंड लावत होतो. आता कमिटीने तीन हजार रुपयांवर दहा तारखेच्या पुढे दोनशे रुपये दंड केलेला आहे. तो योग्य आहे का ? आणि नियमानुसार किती दंड घेणे अपेक्षित आहे. ? एक वाचक, पुणे.  सोसायटी आणि सभासद यांच्यामधील  वाद हे बहुतेक वेळा आर्थिक कारणांशी निगडित असतात. यामध्ये वरचा नंबर येतो मेंटेनन्स ज्यालाच मासिक देखभाल खर्च  /सर्व्हिस  चार्ज असेही म्हणतात. सोसायटीमधील मासिक देखभाल खर्च एक युनिट - एक मेंटेनन्स असा असतो म्हणजेच  सर्व युनिट  धारकांना मग तो  फ्लॅट असो वा / दुकान, १/२/३ कितीही बी.एच.के. असो,  (per unit ) समान असावा हा कायदा आता पक्का झाला आहे. अपार्टमेंट मध्ये हे सर्व खर्च हे क्षेत्रफळाप्रमाणेच द्यावे लागतात. मात्र मासिक देखभाल खर...

जेनेरिक औषधे - सक्ती - योग्य का अयोग्य ? ॲड . रोहित एरंडे ©

 जेनेरिक औषधे  - दुरून डोंगर साजिरे   ?  ॲड. रोहित एरंडे ©  या सध्याच्या युद्धाच्या धामधुमीत एक महत्वाची "सर्वोच्च" बातमी, जिचा आपल्या सगळ्यांशी संबंध आहे, त्याकडे जरा दुर्लक्ष झाले असे वाटते. सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या निमित्ताने "डॉक्टरांनी फक्त जेनेरिक औषधेच लिहून द्यावी असे मत व्यक्त केले" आणि परत एकदा जेनेरिक औषधे हा विषय ऐरणीवर आला. या पूर्वी अशी सक्ती करण्याचा प्रयत्न सरकारकडूनही झाला होता.    मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एम.सी.आय ) ऐवजी २०२० मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन - एन.एम.सी. ) २ ऑगस्ट २०२३ रोजीच्या    त्यांच्या परिपत्रामध्ये डॉक्टरांसाठी व्यावसायीक नितीमत्ता आचारसंहिता प्रसिद्ध केली होती.  त्यामध्ये नोंदणीकृत डॉक्टरांनी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या करू नयेत ह्याचे विस्तृत विवेचन केले आहे. उदा. डॉक्टर कोणत्या पद्धतीने जाहिरात करू शकतात, रेकॉर्ड किती काळ जतन करावे , इन्फॉर्मड कन्सेंट कशी घ्यावी?, रुग्णांप्रती आणि समाजाप्रती  कर्तव्ये कोणती,...

‘सभासदांचे तारतम्य’ हा पुनर्विकासाचा गाभा - ॲड. रोहित एरंडे. ©

  ‘सभासदांचे तारतम्य’ हा पुनर्विकासाचा गाभा ' ॲड. रोहित एरंडे© आमच्या सोसायटीत वीस सभासद असून, आजूबाजूच्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचे काम सुरू झाल्याने त्याचे वारे आमच्याही सोसायटीत वाहू लागले आहेत. आमची इमारत २५ वर्षे जुनी आहे. पुनर्विकासाच्या मुद्द्यावर आमच्या सोसायटीत दोन गट झाले आहेत. एका गटाला वाटते की, सात मजल्यांपेक्षा अधिक उंच इमारत होऊ नये, भले वाढीव जागा मिळाली नाही तरी चालेल; तर दुसऱ्या गटाला वाटते की, पूर्ण चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरून सदनिकेला सदनिका मिळणार असल्यास कितीही मजल्यांची इमारत झाली तरी चालेल. काही सभासदांच्या मते प्रॉपर्टी कार्डावर नाव लावणे, सभासदांची अंतर्गत भांडणे सोडविणे हे काम बांधकाम व्यावसायिकानेच केले पाहिजे. सोयी-सुविधांची मागणी संपतच नाही. यातून मार्ग कसा काढावा, असे अनेक प्रश्न काही सोसायट्यांच्या सभासदांकडून उपस्थित केले जातात. पुनर्विकासाचे वादळ वास्तविक, पुण्यासारख्या महानगरात पुनर्विकासाचे वारे नव्हे, तर वादळच जोरदार घोंगावत आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही आणि प्रत्येक सोसायटीच्या फॅक्टस वेगळ्या असतात. एक कायदेशीर तत्व कायम लक...

रिडेव्हलपमेंट : ७९अ नियमावली केवळ मार्गदर्शक : ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या सोसायटीच्या  रिडेव्हलपमेंटसाठी  ७९अ   नियमाप्रमाणे आम्ही वेळोवेळी  जनरल बॉडी सभा घेतल्या आहेत. जे सभासद हजर नव्हते त्यांनी ऑनलाईन पद्धतीने हजेरी लावली किंवा त्यांचा होकार कळवला आहे. मात्र २-३ सभासद जे विनाकारण रिडेव्हलपमेंटला विरोध करत आहेत ते   कमिटी विरुध्द  आणि आम्ही ७९अ  ची नियमावली  पाळत नाही, कोरम नव्हता, अयोग्य बिल्डर निवडला असे खोटे आरोप करत आहेत आणि  सतत उपनिबंधक साहेबांकडून नोटिसा देत आम्ही प्रामाणिकपणे काम करून देखील आरोप होत असल्याने  काम  नकोसे झाले आहे. या बाबत काय करावे ?  कमिटीचे  त्रस्त सदस्य., पुणे    रिडेव्हलपमेंट चे प्रश्न हे काळे - पांढरे नसतात, त्याचा रंग  करडा असतो हे दिसून येईल. पाहावे करून असे म्हणता येईल. रिडेव्हलपमेंटमधील  वाद लक्षात घेता महाराष्ट्र सरकारने सहकार कायदा कलम ७९अ अंतर्गत २००९ साली फक्त  सोसायट्यांसाठी (अपार्टमेंट  नाही)   नियमावली जारी  केली  आणि त्यामध्ये २०१९ मध्ये सुधारणा केल्या. मात्र व्यावहारिक दृष्ट्या काही वेळ...

मृत्युपत्राचा लाभार्थीच आधी मयत झाल्यास.. ॲड. रोहित एरंडे ©

  मृत्युपत्राचा  लाभार्थीच आधी मयत झाल्यास..  माझ्या आईने जे विल केले होते त्यामध्ये तिच्या  मिळकतीचे आम्हा ३ बहिणींमध्ये कसे वाटप होईल हे लिहून ठेवले होते. आमचे  वडील अनेक वर्षांपूर्वीच  गेले आहेत.  मात्र माझ्या थोरल्या बहिणीचा  मृत्यू आमच्या आईच्या  हयातीतच झाला आणि त्यानंतर सुमारे २-३ वर्षांनी आमची आई गेली.   आता  जी बहीण आईपूर्वीच  मयत झाली  तिच्या मिळकतीची विभागणी कशी होईल ? तिला  पती आणि २ मुले   आहेत. कृपया मार्गदर्शन करावे  एक वाचक, ठाणे  मृत्युपत्र हे करावेच आणि तेही तज्ञ वकीलांकडून करून घ्यावे जेणेकरून आपल्या पश्चात आपल्या  मिळकतीचे विभाजन सुकर होण्यास मदत होईल  हे अनेक लेखांमधून यापूर्वी मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्युपत्रासारखी महत्वाची गोष्ट जी आपल्या लाखो -कोटी  रुपयांच्या मिळकतीशी संबंधित असते तिथे मिळकतीच्या किंमतीपुढे  थोडेसे पैसे वाचविण्यासाठी  दुसऱ्याचे मृत्युपत्र कॉपी करून किंवा गूगल वरील अर्धवट माहितीच्या आधारे  मृत्युपत्र केल्यास ...

निष्काळजीपणामुळे श्वान चावल्यास मालकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. ॲड. रोहित एरंडे ©

   निष्काळजीपणामुळे  श्वान चावल्यास मालकावर फौजदारी  कारवाई  होऊ शकते.  ॲड. रोहित एरंडे ©  प्रश्न : आमच्या  सोसायटीमध्ये  एका  सभासदाने त्याचं फ्लॅटमध्ये २ कुत्रे पाळले आहेत, जे सारखे भुंकत असतात आणि बऱ्याचदा सभासदांच्या अंगावर येतात आणि बाकीच्या सभासदांना त्याची खूप  भिती वाटते. एक-दोन सभासदांना त्याचा 'प्रसाद' मिळाला आहे  देखील आहे. त्याचे मालक स्वच्छतेची नीट काळजी घेत नाहीत आणि काही सांगायला गेल्यास सतत 'पेटा कायद्याची धमकी देतात.      सोसायटी पदाधिकारी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. या सर्वाचा आम्हाला आणि इतर सभासदांनाही खूप त्रास होत आहे   तरी या बाबत कृपया मार्गर्दशन करावे.. एक वाचक पुणे.  पु.ल. ज्यांना "पाळंदे" असे मजेने संबोधायचे   असे    प्राणी पाळणारे मोजके लोक आणि इतर सभासद यांच्यामध्ये वादावादी होतेच. कुत्री, मांजरी पाळण्यास कायद्याने बंदी नाही  आणि कित्येक जण योग्य ती काळजी घेऊन पाळतात देखील. परंतु काही सभासद नीट काळजी घेत नाहीत. कुठलेही प्राणिप्रेम हे कायद...

व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत नको.. ॲड. रोहित एरंडे ©

  व्यवहार आणि नातेसंबंध यामध्ये गल्लत नको..   आर्थिक स्थितीप्रमाणे मिळकतीमधील हक्क कमी-जास्त होत नाहीत :  ऍड. रोहित एरंडे. © मी आणि माझे पती दोघेजण मिळून आमच्या सासू-सासऱ्यांची सेवा करत आलो. माझ्या नणंदा , भावजया , दीर यापैकी कोणीही वेळेला मदतीला आले नाहीत. या सर्वांची आर्थिक स्थिती आमच्या पेक्षा खूपच चांगली आहे. मात्र आता सासू - सासरे गेल्यावर सर्व जण हक्क मागायला पहिले आले. तर आम्ही त्यांना हक्कसोड पत्र द्या असे म्हणू शकतो का ?  किंवा आम्ही जे सेवा केली त्यामुळे आम्हाला जास्त हिस्सा मिळू शकतो का ? एक वाचक, पुणे.   तुमच्यासारखे प्रश्न बरेचदा बघायला मिळतात. पण    कायदेशीर हक्क आणि इमोशन्स - भावना यांच्यामध्ये कायदा हक्कांच्या बाजुने उभा राहतो. "खायला आधी, कामाला कधी-मधी" अशी एक मराठीत म्हण आहे. हक्क आणि कर्तव्ये या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, पण लक्षात कोण घेतो ? आई-वडिलांची सेवा करणे हे प्रत्येक मुला-मुलीचे मग तो विवाहित असो व नसो त्याचे कर्तव्यच असते आणि यामध्ये जावई आणि सुना देखील भाग घेतातच आणि तुम्ही सुध्दा तेच केले आहे.  एकतर ...

दारू पिणे व उच्च रक्तदाब याचा कर्करोग होण्याशी संबंध विमा कंपनी सिध्द करू शकली नाही . ऍड. रोहित एरंडे ©

विमा कंपनीला उच्च न्यायालयाचा दणका . दारू  पिणे व  उच्च रक्तदाब याचा कर्करोग होण्याशी संबंध   विमा कंपनी सिध्द करू शकली नाही . ऍड. रोहित एरंडे © वैद्कयीय विमा फेटाळला गेल्यावर  विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्ये नेहमीच वाद होतात आणि विमा कंपनीची कारणे आणि ग्राहकांची स्पष्टीकरणे कधीच एकमेकांना मान्य होत नाहीत आणि मग कोर्टाची दारे ठोठवावी लागतात.   दारू प्यायची  सवय आणि उच्च रक्तदाब विमा कंपनीपासून लपवून ठेवली आणि या दोन्ही कारणांनी कॅन्सर (कर्करोग) होतो  याचा कोणताही पुरावा न देता     विमा क्लेम नाकारल्यामुळे  मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच  विमा  लोकपाल आणि  विमा  कंपनीला चांगलाच दणका दिला. या केसची थोडक्यात हकीकत बघू. विमाधारक - श्री. प्रकाश मेहता यांनी 2003 साली रॉयल सुंदरम या कंपनीकडून वैद्यकीय विमा पॉलिसी घेतली होती. 2021 साली मिळालेल्या सल्ल्याने त्यांनी केअर हेल्थ इन्शुरन्स या कंपनीकडे जुनी पॉलिसी पोर्ट केली आणि रु. 5 लाख रुपयांची नवीन पॉलिसी घेतली आणि कंपनीच्याच सल्ल्यावरून त्यांनी रु. 50 लाख रुपय...

लिव्ह-इन रिलेशनशिप आणि फ्लॅटमधील हक्क : ॲड. रोहित एरंडे ©

  लिव्ह-इन रिलेशनशिप आणि फ्लॅटमधील  हक्क :    गेले ४-५ वर्षे मी आणि माझा मित्र  लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहत आहोत आणि आम्हाला दोघांना  मिळून एक फ्लॅट विकत घ्यायचा  आहे. अजून आम्ही लग्नाचे ठरवले नाही. तसेच त्या बिल्डिंगचे  रिडेव्हलपमेंटचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे  नवीन फ्लॅट देखील आमच्याच नावावर होईल काय ? मात्र भविष्यात आमच्यामध्ये काही वाद निर्माण झाल्यास आमच्या या फ्लॅटची मालकी याबद्दल काय करता येईल ?  आमच्या पैकी एकाच्याच नावावर फ्लॅट हवा असेल तर काय करावे ? एक वाचक, मुंबई .   लिव्ह-इन रिलेशनशिप हा प्रकार आता आपल्याकडे काही नवीन नाही.  दोन सज्ञान  भिन्नलिंगी पण अविवाहित व्यक्तींनी लग्नासारखे एकत्र राहणे म्हणजे लिव्ह-इन-रिलेशन असे व्याख्या हा विषय माहिती नसणाऱ्यांसाठी करता येईल.  मात्र  एखादी गोष्ट कोणाला अनैतिक वाटली तरी ती बेकायदेशीर असलेच असेही नाही. असो. आपल्या प्रश्नात अनेक उपप्रश्न आहेत, त्या सर्वांची थोडक्यात उत्तरे देणायचा प्रयत्न करतो.  कायद्याने कुठलीही सज्ञान व्यक्ती आणि जिचे मान...

महिलांच्या मिळकतीमध्ये वाटेकरी कोण ? ॲड. रोहित एरंडे. ©

  महिलांच्या  मिळकतीमध्ये वाटेकरी कोण ? ॲड. रोहित एरंडे. © माझ्या पत्नीच्या  एकट्याच्या  नावावर एक फ्लॅट आहे आणि दुसरा फ्लॅट तिच्या आणि माझ्या नावावर आहे. माझी पत्नी २ वर्षांपूर्वी गेली. तिचे इच्छापत्र नाही .. तर  हे दोन्ही फ्लॅट मी पती या नात्याने    मला एकट्यालाच मिळतील ना  ?   त्यामध्ये  माझ्या मुला -मुलीचा आणि सून -जावयाचा काही हक्क येतो का ? एक वाचक,  मुंबई    हिंदू  पुरुष आणि महिला यांच्याबाबत वारसा हक्काचे नियम वेग-वेगळे आहेत, तरीही पती नंतर फक्त पत्नीलाच  आणि पत्नी नंतर फक्त पतीलाच  एकमेकांची मिळकत मिळेल, असा कायदा नाही. असो. या निमित्ताने परत एकदा या विषयाची थोडक्यात माहिती घेऊ.  हिंदू वारसा कायदा  कलम १४ अन्वये महिलांना  एखादी स्थावर / जंगम मिळकत वारसाने, वाटपाने, पोटगीसाठी किंवा पोटगीच्या फरकापोटी, मृत्यूपत्र किंवा बक्षीसपत्र किंवा खरेदीखत अश्या दस्तांनी, स्त्री-धनापोटी इ. प्रकारे आणि कोणाकडूनही मिळाल्यास ती महिला अश्या मिळकतींची संपूर्ण मालक होते. ह्याला अपवाद म्हणजे अश्या दस्...

पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीचे वारस कोण ? ॲड. रोहित एरंडे.©

 पतीच्या मृत्यूनंतर मिळकतीचे  वारस कोण  ? ॲड. रोहित एरंडे.© माझ्या आणि माझ्या पतीच्या  नावे एक फ्लॅट आहे. माझ्या पतीचे मागच्या वर्षी आकस्मिक निधन झाले. त्यांनी कोणतेही मृत्यूपत्र केले नव्हते.  मूळ ऍग्रिमेंट मध्ये पहिले नाव माझ्या पतीचे आणि दुसरे माझे आहे.  आम्हाला मूल बाळ नाही. मला सासू सासरे आहेत, पण त्यांच्याशी संबंध चांगले नाहीत, त्या सारख्या मला पाण्यात पाहतात आणि आता  सासूबाई सारखा हिस्सा मागत आहेत ? तर नवऱ्याचा हिस्सा  मला एकट्यालाच मिळेल, का सासू-सासऱ्यांना पण ? श्रीमती XXX ,मुंबई.  आपल्यासारखे प्रश्न बऱ्याच जणांना पडतात. अनेक लोकांना असे वाटत असते कि वैवाहिक साथीदाराच्या मृत्यूनंतर उर्वरित जोडीदाराच आपोआप एकटा १००% मालक बनतो. तसेच अनेक गैरसमज असा आहे कि पहिले नाव ज्याचे असते त्याचा हिस्सा किंवा अधिकार हा दुसरे नाव असलेल्यापेक्षा जास्त असतो आणि पहिले नाव असलेली व्यक्ती मयत झाली कि आपोआप सर्व हक्क दुसरे नाव असलेल्या व्यक्तीलाच मिळतो.  एखाद्या मिळकतीमध्ये मालकी हक्क हा व्यक्तींच्या हयातीमध्ये  खरेदीखत, बक्षीसपत्र, हक्कसोड पत्र,...

मासिक पाळीस आजार संबोधून इन्शुरन्स क्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका . ॲड. रोहित एरंडे ©

मासिक पाळीस आजार  संबोधून  इन्शुरन्स क्लेम नाकारणाऱ्या कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका ...  ॲड. रोहित एरंडे ©  पैसे असतील तर आजारी पडा , असे गंमतीने म्हंटले जाते याचे कारण सध्याच्या काळात हॉस्पिटलमधील उपचार हे सामान्यांच्या  आवाक्यात असतीलच  असे नाही (यामध्ये महत्वाची बाब म्हणजे   हॉस्पिटल बिलामध्ये डॉक्टरांची फी ही  तुलनेने कमी असतात) असो. वेळ काही सांगून येत नाही म्हणून वैद्यकीय विमा घेणे चांगले असते. परंतु भारतात फक्त ३८% लोकांकडे वैद्यकीय विमा - हेअल्थ इन्शुरन्स असल्याचे मागीलवर्षातील आकडेवारी सांगते. असा वैद्कयीय विमा घेताना ग्राहकाला काही पूर्व-आजारांची, चालू असलेल्या ट्रीटमेंटची माहिती प्रपोजल फॉर्म मध्ये भरणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा असे फॉर्म स्वतः किंवा  विमा एजंटकडून भरून घेताना कॅज्युअली / पूर्ण तपशिलासह भरली गेली नाही  तर त्याची परिणीती क्लेम रद्द होण्यात होऊ शकते. एकतर हॉस्पिटलमुळे आधीच पेशंट आणि नातेवाईक यांची मानसिक स्थिती नीट असते, त्यातच विमा नाकारला गेला तर पैश्याचे सोंग कुठून आणायचे ? या संदर्भात विमा कंपनी आणि ग्...

झाड एकाचे, फांद्या दुसरीकडे मग फळांवर हक्क कोणाचा ? ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या सोसायटीमध्ये आंब्याची काही मोठी  झाडे आहेत. मात्र त्यांच्या फांद्या शेजारच्या सोसायटीमध्ये गेल्या आहेत. आता बऱ्याचवर्षांनी  आंब्याच्या मौसमात या झाडांना चांगले आंबे आले आहेत आणि हे आंबे कोणी घ्यायचे यावरून वाद-विवाद दोन्ही सोसायट्यांच्या सभासदांमध्ये  सुरु  झाले आहेत. आमचे म्हणणे आहे की  झाड आमचे  असल्यामुळे आंबे आम्हीच घेणार, तर शेजारची सभासद म्हणतात  फांद्या आमच्या भागात आल्यामुळे, त्याचा कचरा आम्ही साफ करतो त्यामुळे  आम्हीच आंबे घेणार. या बाबतीत काही कायदा आहे असे ऐकले , तर कृपया मार्गर्दर्शन करावे.  सोसायटी पदाधिकारी, पुणे.  हा प्रश्न वाचून अनेकांना लहानपणी दुसऱ्याच्या झाडावरील   पाडलेले आंबे, चिंचा यांची आठवण झाली असेल. पण कायदेशीर तरतुदींकडे वळण्यापूर्वी सोसायटीबाबत एक निरीक्षण नोंदवावेसे वाटते की (सोसायटीमधील) बहुतांशी वाद हे इगो मधून आणि "हमसे  आया  ना गया - तुमसे बुलाया ना गया" सारख्या विचारसरणीतून - संवादाच्या अभावातून होतात. "तुटे वाद, संवाद तो हितकारी" म्हणजेच सुसंवाद केल्यास वाद टाळता येतात हे रामद...

छळणुकीपासून डॉक्टरांना 'सर्वोच्च' दिलासा ॲड. रोहित एरंडे ©

  छळणुकीपासून डॉक्टरांना 'सर्वोच्च' दिलासा ॲड. रोहित एरंडे © सर्वच डॉक्टरांना एकच चष्म्यातून बघणे चुकीचे आहे. उडदामाजी काळे-गोरे असणारच. न्यायालयाचा वैद्यकीय निष्काळजीपणाबद्दलचा दृष्टिकोन कायम संयत राहिला आहे. त्याबद्दल थोडेसे..  * वैदयकशास्त्राला Incomplete Science असे संबोधले जाते.* वैद्यकशास्त्राचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. ते एक अत्यंत प्रगत असे शास्त्र असून, दररोज त्यात काहीतरी नावीन्यपूर्ण शोध लागत आहेत. मात्र, असे असले तरी वैद्यकशास्त्राला परिपूर्ण शास्त्र असे म्हणता येणार नाही इतका त्याचा आवाका मोठा आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती असल्याने उपचारांचा परिणामही वेगवेगळा ठरतो. एखाद्या आजारावर उपचार करण्याच्या वेगवेगळ्या; पण मान्यता प्राप्त व वापरलेल्या पद्धती असू शकतात. प्रत्येक पद्धतीचे फायदे व तोटे असतात. अशापैकी प्राप्त परिस्थितीत डॉक्टरांनी त्यांच्या ज्ञानाच्या व कौशल्याच्या आधारे निवडलेल्या उपचारपद्धतीला यश न आल्यास त्या डॉक्टरला वैद्यकीय निष्काळजीपणासाठी दोषी धरायचे का, असा प्रश्न कुसुम शर्मा वि. बात्रा हॉस्पिटल (AIR 2010 SC 1050) या याचिकेच्या निमित्ताने सर्वोच्...

केवळ लग्न झाले म्हणून सासू सासऱ्यांच्या मिळकतीमध्ये जावई-सुनेला मालकी हक्क मिळत नाही. ॲड. रोहित एरंडे. ©

  केवळ लग्न झाले म्हणून  सासू सासऱ्यांच्या मिळकतीमध्ये जावई-सुनेला  मालकी हक्क  मिळत नाही.  ॲड. रोहित एरंडे. © आम्हा नवरा बायकोचा स्वकष्टार्जित फ्लॅट आहे आणि आता रिडेव्हलपमेंट झाल्यावर खूप मोठा फ्लॅट आम्हाला मिळणार आहे. आम्हाला एकच मुलगा आह आणि आम्ही त्याच्या लग्नाचे बघत आहोत. थोडे ऑड वाटेल, पण    एकतर सध्या डिव्होर्स  केसेस वाढीस लागल्या आहेत. भविष्यात आमच्या मुलाच्या बाबतीत असे काही झाल्यास  आमच्या सुनेचा त्यावर  अधिकार राहील का ? फक्त मुलाच्या नावे आत्ताच  बक्षीसपत्र केले  तरी सुनेला हक्क मिळेल का ?   एक पालक, पुणे.  प्रॉपर्टी असली तरी त्रास, नसली तरी त्रास  असे म्हणतात.  मात्र जेव्हा असे वाद आपल्या रक्ताच्या नात्यातील लोकांशी होतात तेव्हा  संताप आणि मानसिक क्लेश या दोन्ही भावना एकाच वेळी दाटून येतात याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल.  आपल्या प्रकरणामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे फ्लॅट तुमचा   स्वकष्टार्जित फ्लॅट आहे. त्यामुळे तुमच्या  हयातीमध्ये तर तुमच्या मुलाला सुध्दा यामध्ये क...

भाषा सक्ती करता येईल ? : ॲड. रोहित एरंडे ©

भाषा सक्ती करता येईल  ?  ॲड. रोहित एरंडे ©  "एखादी भाषा ही विशिष्ट  धर्माची जहागीर नाही, भाषा  हे  संपर्काचे माध्यम आहे. त्यामुळे  हिंदी ही  हिंदूंसाठी आणि उर्दू हि फक्त मुस्लिमांसाठी हे मानणे चूकच आहे, " असे नमूद करून सर्वोच्च न्यायालयाने मागील आठवड्यात अकोला नगरपालिकेने उर्दू भाषेमध्ये लावलेले फलक काढावे अशी मागणी केलेली याचिका  फेटाळताना वरील निकाल दिला.आता वाळू या हिंदी सक्तीच्या निर्णयाकडे कडे  सर्व शाळांमध्ये  पहिलीपासून हिंदी भाषा विषय सक्तीचा करण्यासाठी कायदा करणार असल्याचे   सरकारने जाहीर केले आणि परत एकदा  विवादास्पद विषय सुरू झाला आहे. आपल्याला आठवत असेल तर ४-५ वर्षांपूर्वी मराठी मातृभाषा म्हणून मराठीची सक्ती करणाऱ्या निर्णयाला देखील असाच विरोध झाला होता.   अर्थात या विरोधाला आता राजकारणाची जोड मिळाल्यामुळे याच्या विरोधात अनेक पक्ष सरसावले आहेत. तर मराठी, इंग्रजी या बरोबरच हिंदी  हि तिसरी भाषा केल्याने देशभरात बदलत चाललेय मूल्यमापन पद्धतीमध्ये आपली मुले पुढील काळात मागे पडणार नाहीत असे तज्ज्ञ...

ऑनलाईन फ्रॉड : आरबीआय आणि न्यायालयांचा ग्राहकांना दिलासा : ॲड. रोहित एरंडे ©

ऑनलाईन फ्रॉडच्या  फसवणुकीवर आरबीआय आणि  न्यायालयांचा   ग्राहकांना दिलासा      ॲड. रोहित एरंडे © सध्याच्या ऑनलाईन  जमा‍न्यात सायबर फ्रॉड    मोठ्या प्रमाणात वाढले आहे . त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची संख्या जास्तच आहे. रस्त्यावर वस्तू विक्री करणाऱ्यांपासून ते बँकांचे व्यवहार ऑनलाईन माध्यमातून होत आहेत.    सोयी तितक्या  गैरसोयी असे आपल्याकडे म्हणतात त्याप्रमाणे "वन क्लिक अवे " च्या  जमान्यात अशी  घटना  घडल्यावर, ,   कोणताही  खातेदार अगदी हतबल होऊन जातो कारण काही कळायच्या आत पैसे गेलेले असतात.  बऱ्याचदा बँक  खातेदार  अनावधानाने अश्या फ्रॉडचे बळी पडतात. ज्यांचे पैसे जातात त्यांना आपण फसले गेलो याचे अतीव दुःख असतेच आणि त्याचा राग येतो. मात्र या दुःखावर आरबीआय आणि उच्च न्यायालयांनी तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाने ग्राहकांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम केले आहे आणि याची माहिती बहुतेक जणांना नसल्याची दिसून येते. या लेखाच्या निमित्ताने या व...

'सभासदांचे तारतम्य' हा रिडेव्हलपमेंटचा गाभा. : ॲड. रोहित एरंडे ©

'सभासदांचे तारतम्य' हा रिडेव्हलपमेंटचा गाभा. :  ॲड. रोहित एरंडे ©  आमच्या २० सभासदांच्या  सोसायटी मध्येही रिडेव्हलपमेंटचे वारे व्हायला लागले आहे. कारण आजूबाजूच्या सोसायट्यांचे काम सुरूही झाले आहे. आमची बिल्डिंग २५ वर्षे जुनी आहे.  मात्र आमच्याकडे २  गट पडले आहेत. एका गटाला वाटते कि   ७  मजल्याच्या वर बिल्डिंग होऊ नये  भले  जास्त वाढीव जागा नाही मिळाली तरी चालेल ,   तर  दुसऱ्या गटाला वाटते कि  पूर्ण FSI  वापरून फ्लॅटला फ्लॅट मिळणार  असेल तर कितीही मजली   बिल्डिंग झाली  तरी बेहतर, त्यातच काही सभासदांच्या मते प्रॉपर्टी कार्डवर नाव लावणे, सभासदांची अंतर्गत वाद सोडवणे हे बिल्डरनीच करायला हवे आहे आणि सोयी-सुविधांची मागणी तर संपतच नाही.  तर यातून कसा मार्ग काढावा ? काही सभासद, पुणे.  पुण्यासारख्या ठिकाणी  रिडेव्हलपमेंटचे वारे, काय मी तर वादळच म्हणेन,  जोरात व्हायला लागले आहेत ह्यात काही शंका नाही.  एक कायदेशीर तत्व लक्षात घ्यावे, एखादी गोष्ट  कायद्याने   करावीच...

दुकान असो वा फ्लॅट, सोसायटीमध्ये मासिक देखभालखर्च सर्वांना समान : ॲड. रोहित एरंडे ©

आमच्या    बिल्डिंगमध्ये खाली   ४ दुकाने   आणि बाकी  २५ फ्लॅट्स आहेत.  एक दुकानात मी माझा किराणा व्यवसाय सुरु  केला आहे. बाकी तिन्ही गाळे बंद आहेत. माझे दुकान बिल्डिंग बाहेरच्या बाजूला  असून रहिवासी बिल्डिंगचे  पार्किंग, लिफ्ट,दिवे, साफसफाई  इ. सेवा  मी  वापरत नाही.  फ्लॅटसाठी मासिक मेंटेनन्स  रु. ५००-/इतका आहे, पण मी दुकानदार आहे, मी त्यातून पैसे कमावतो सबब मी जास्त पैसे द्यायला पाहिजे म्हणून माझ्याकडून रु. ७००/- घेतात.   हे चुकीचे नाही का ?  या साठी कुठे दाद मागू शकतो?   एक वाचक, नाशिक  प्रत्येक सोसायटीमध्ये कळीचा मुद्दा असलेला मासिक देखभाल खर्च / सेवा-शुल्क (मेंटेनन्स)  किती असावा हे ठरविण्याचा अधिकार सोसायटीला नक्कीच आहे. मात्र तो देखभाल खर्च सर्वांना सामान असावा हे  कायदा सांगतो.  निवासी असो वा  व्यावसायिक, पहिल्या मजल्यावर राहताय  का  शेवटच्या मजल्यावर, फ्लॅट छोटा आहे का मोठा, त्यानुसार मेंटेनन्स कमी जास्त होत नाही.    या   ...